देवगड : बंदरात आश्रयासाठी आलेल्या गुजराती नौकांवरील खलाशी मद्यधुंद अवस्थेत बाचाबाची करून एकमेकांसमोर भिडले. बिअरच्या बाटल्यांनी केलेल्या मारहाणीत चौघे खलाशी जखमी झाले आहेत. ही घटना देवगड बाजारपेठ येथे सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, या हाणामारीच्या घटनेने देवगड किनारपट्टीवर खळबळ माजली आहे.गुजरात येथील ईश्वर शंकर सोरटी (वय ५०), अक्षय अशोक सोरटी (१९), मिलन अशोक सोरटी (२३), अशोक रामू सोरटी (४९), सतीश विश्वास सोरटी (३०) (सर्व राहणार कलागाव, छाबाडीपाड, ता. उमरगाव, जि. बलसाड, गुजरात), पुनित अशोक सोरटी (२६), मनिष शांतीलाल सोरटी (२७) (राहणार कलगाव, सोरटावाडा, ता. उमरगाव, जि. बलसाड, गुजरात) या सात खलाशांमध्ये हा हाणामारीचा प्रकार घडला. यातील चौघेजण जखमी झाले आहेत. समुद्रात वादळसदृश वातावरण असल्यामुळे गेले तीन चार दिवस देवगड बंदरामध्ये स्थानिकांबरोबरच परराज्यातील नौकाही आश्रयासाठी दाखल झाल्या असून या नौकांवरील खलाशांना बाजारपेठेतुन सामान नेण्यासाठी काही खलाशी होडीच्या सहाय्याने देवगड चांभारभाट येथे उतरून देवगड बाजारपेठेत सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आले होते.अर्धा तास हाणामारीचा थरारसोमवारी सामान खरेदी झाल्यानंतर बहुतांशी खलाशांनी मद्यपान केले. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या गुजरातमधील खलाशांच्या दोन गटात अचानक बाचाबाची सुरू झाली.बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. हातात घेतलेल्या बीअरच्या बाटल्याही एकमेकांच्या अंगावर फेकून मारण्यात आल्या.अर्धा तास हा हाणामारीचा थरार सुरू होता.या थराराने बाजारपेठेतील ग्रामस्थही भयभीत झाले.त्यातील काही ग्रामस्थांनी सोडविण्याचा प्रयत्न केला त्यांनाही या मारहाणीत धक्काबुक्की झाली यामध्ये दोघांना किरकोळ प्रमाणात दुखापत झाली....मोठा अनर्थ टळलामारहाणीत बीअरशॉपीजवळून जाणाऱ्या रस्त्यांवर मारहाणीचा थरार सुरू होता. काही खलाशी विरूध्द बाजुच्या खलाशांना लोटून देत होते. याच धक्काबुक्कीत एक खलाशी गटारात पडल्यामुळे त्याच्या डोक्यावर विरोधी गटातील खलाशी मोठा दगड घेवून त्याला ठार मारण्याच्या इराद्याने धावत जावून घालत असतानाच स्थानिक ग्रामस्थांनी त्या खलाशाचा हातातील दगड हिसकावून घेवून त्या खलाशाला वाचविल्यामुळे मोठा अनर्थ टळविला.स्थानिक मच्छिमार भयभीतअशी जीवघेणी हाणामारी परराज्यातील खलाशी देवगड बंदरात येवून करत असल्यामुळे येथील मच्छिमारही भयभीत झाले आहेत. अशा खलाशांवर पोलिसांनी करडी नजर ठेवून ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातुन उपाययोजना करावी. काही खलाशी पालघर जिल्ह्यातीलयावेळी स्थानिक कोल्ड्रींक्स व्यवसायिक संजय धुरी यांनी या प्रत्यक्षदर्शी पाहिलेल्या मारहाणीची माहिती पोलिस ठाण्याला दिली. मात्र, पोलिस दाखल होईपर्यंत खलाशी बंदराकडे निघून गेले. अखेर पोलिसांनी तेथे जावून त्यांना ताब्यात घेतले. पोलिस स्टेशनला आणून पोलिसांनी त्यांचे जाबजबाब घेतले असून यातील काही खलाशी हे महाराष्ट्रातील पालघर जिल्'ातील तलासरी डहाणू या गावातील असून मारहाणीत जखमी व मारहाण करणारे गुजरात राज्यातील खलाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत मारहाण करणाऱ्या खलाशांचे जाबजबाब व गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पोलिस स्थानकात चालू होती.
गुजराती नौकांवरील खलाशांमध्ये हाणामारी
By admin | Published: September 19, 2016 11:46 PM