रत्नागिरी : वैज्ञानिक युगातील आव्हाने डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या शिर्के प्रशालेतील अॅड. बाबासाहेब नानल गुरुकुलतर्फे विद्यार्थ्यांनी रत्नागिरी - हेदवी - रत्नागिरी अशी सायकल सहल पूर्ण केली.गुरुकुल व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. रघुवीर भिडे यांच्याहस्ते व पालकांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून सायकल सहलीस सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी आरे-वारेमार्गे गणपतीपुळे हा प्रवास सकाळ सत्रात यशस्वीपणे पूर्ण केला. प्रवासात विद्यार्थ्यांनी समुद्र किनाऱ्यावरील खारफुटीचे वन, छोट्या लाँच बांधणीचे कारखाने, केशवसूत स्मारक यांची माहिती घेतली. जयगड येथे झगडे यांच्या घरी दुपारी भोजन करुन पुढील हेदवी चिंद्रवलेपर्यंतचा प्रवास सायंकाळी ७.३० वाजता पूर्ण केला. त्या ठिकाणची निवास व भोजनाची व्यवस्था रमेश सुर्वे यांनी उत्तमरित्या केली. दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० वाजता परतीचा प्रवास सुरु केला. दोडवली, मासू, भातगावमार्गे रत्नागिरी असा प्रवास पूर्ण केला. दुपारच्या भोजनाची व्यवस्था संतोष सावरकर यांनी केली. गुरुकुलच्या ३० विद्यार्थी व ८ विद्यार्थिनी सहलीत सहभागी झाल्या होत्या. सहल यशस्वी करण्यासाठी गुरुकुल शिक्षक किरण सनगरे, गौरव पिळणकर, देवराम दळवी, प्रेमचंद तेंडुलकर यांनी विशेष प्रयत्न केले. यासोबत पालक रमेश सुर्वे, संतोष सावरकर, दत्ताराम मुंडेकर यांचे सहकार्य लाभले. गुरुकुल व्यवस्थापन समिती अध्यक्ष रघुवीर भिडे, गुरुकुलप्रमुख राजेश आयरे व र. ए. सोसायटीच्या विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले. (प्रतिनिधी)दोन दिवसांची सायकल सहल.गुरुकुलच्या ३८ विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग.वद्यार्थ्यांसह पालकांचेही सहकार्य.पालकांच्या उपस्थितीत सायकलफेरीचे उद्घाटन.
सायकल सफरीतून विद्यार्थ्यांचा आनंद दुणावला!
By admin | Published: February 18, 2015 10:30 PM