कणकवली : खासगी वाहनांना टप्पा वाहतुकीला परवानगी देणे तसेच एसटी महामंडळाला जाचक असलेल्या अटींबरोबरच इतर समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)च्यावतीने ११ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे इंटकचे विभागीय अध्यक्ष अशोक राणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाविरोधातील प्रस्तावित रोड ट्रान्सपोर्ट अँड सेफ्टी बिल २०१४ मधील तरतुदीनुसार खासगी वाहनास टप्पा वाहतुकीला परवानगी देण्यात येणार आहे. तसेच या प्रस्तावित विधेयकातील कलम १४५, १४७, १४८ अन्वये या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतर राज्य पातळीवर, तालुका पातळीवर वेगवेगळ््या प्रकारे प्रवासी वाहतूक व्यवस्था निर्माण होणार आहे. यातील निविदा प्रक्रियेमुळे एसटी महामंडळाच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होणार असून त्याचा फटका कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचाऱ्यांना बसणार आहे. त्यासाठी इंटकच्यावतीनेजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.११ फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यात विविध ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इंटकचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांच्या आदेशाने आंदोलन करण्यात येणार आहे, असेही या पत्रकात म्हटले आहे. (वार्ताहर)
इंटक करणार ११ रोजी धरण
By admin | Published: February 05, 2015 8:29 PM