मालवण/ देवगड/ वेंगुर्ले : गेले तीन दिवस सिंधुदुर्गात पावसाची रिप-रिप सुरूच आहे. गुरुवारीही पावसाच्या सरी कोसळल्या. मालवण तालुक्यात बुधवारी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. बुधवारी सायंकाळपासून वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. तालुक्यातील आनंदव्हाळ गावाला वादळी वाऱ्याचा फटका बसला. यावेळी शिंदेवाडी येथील गुरुनाथ भगत यांच्या घरावर जुनाट चिंचेचे झाड कोसळल्याने नुकसान झाले. तसेच सावंतवाडी येथील प्रभाकर भगवान सावंत यांच्या घरावर घळणीचा दगड कोसळून नुकसान झाले आहे. तलाठी बी. डी. लोबो यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून दोन्ही घटनांत सुमारे ७१ हजार ७०० रुपयांचे नुकसान झाले आहे. मालवणात बुधवारी सुमारे ९६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. पावसामुळो विज पुरवठाा काही काळ खंडीत झाला होता. मालवण आनंदव्हाळ शिंदेवाडी येथे चिंचेचे झाड उन्मळून भगत यांच्या घरावर सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास कोसळले. यावेळी भगत यांच्या पत्नी सुषमा भगत यांच्या डोक्यावर घराची कौले पडल्याने त्यांनी आरडाओरडा केला. गुरुनाथ भगत व त्यांचे नातेवाईक नितीन ओझरकर यांनी त्यांना तत्काळ बाहेर आणले. घरावर जुनाट भलेमोठे झाड कोसळल्याने भगत कुटुंबीयांची तारांबळ उडाली. सर्वजण घरातून वेळीच बाहेर पडल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. (प्रतिनिधी)देवगड तालुका २४ तास अंधारातदेवगड : बुधवारी झालेल्या वादळामुळे खारेपाटण-तरेळे दरम्यान असलेल्या ३३ केव्ही विद्युत वाहिनीमध्ये बिघाड झाल्याने देवगड तालुका सुमारे २४ तास अंधारात राहिला. तसेच तालुक्यामधील अंतर्गत विद्युत वाहिनीही तुटल्याचे दिसून येत होते. यामुळे तालुक्यातील काही गावांना ३६ तास अंधारात काढावे लागले.वेंगुर्लेतही वीजपुरवठा खंडित : वेंगुर्लेसह शहरात गेले दोन-तीन दिवस पाऊस पडत आहे. वीज पुरवठ्याबरोबरच दूरध्वनी सेवाही ठप्प झाली. विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
घरावर दरड कोसळून नुकसान
By admin | Published: June 09, 2016 11:55 PM