तळवडे : होडावडे येथील रिक्षाचालक-मालक संघटनेतर्फे यावर्षी प्रथमच होडावडे येथे दशावतारी नाट्यमहोत्सवाचे आयोजन केले आहे. हा महोत्सव २४ ते २७ एप्रिल या कालावधीत होणार आहे.महोत्सवाच्या प्रारंभी २४ एप्रिलला संघटनेतर्फे होडावडे गावातून सायंकाळी दिंडी, प्रबोधन फेरी, जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता शरद मोचेमाडकर प्रस्तुत जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ, ओरोस यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. २५ ला सायंकाळी ७ वाजता नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळ, मोचेमाड यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. २६ ला बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्यमंडळ, कवटी-कुडाळ यांचा नाट्यप्रयोग, तर २७ ला सायंकाळी ७ वाजता सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरूर-कुडाळ यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या नाट्यमहोत्सवाचे उद्घाटन होडावडेचे सरपंच राजबा सावंत, होडावडे ग्रामोन्नती मंडळ, मुंबईचे अध्यक्ष मोहन नाईक, व्यापारी आनंद काजरेकर (तळवडे), शामसुंदर पेडणेकर (मातोंड) यांच्या उपस्थितीत होणार आहे.यावेळी लकी ड्रॉ धमाका सोडत होणार आहे. या नाट्यमहोत्सवाचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन होडावडे रिक्षा चालक - मालक संघटनेचे अध्यक्ष सुभाष दळवी, सचिव प्रसाद परब यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
होडावडेत २४ एप्रिलपासून दशावतारी नाट्यमहोत्सव
By admin | Published: April 16, 2015 9:17 PM