सावंतवाडी : सावंतवाडी मोती तलावातील जलपर्णी साफ करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यातच मंगळवारी सकाळी तलावातील मासे मृतावस्थेत आढळून आले. मासे मृत होण्यामागचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. जलपर्णीमुळे तलावाचे सौंदर्य हरवत चालले होते. म्हणून नगरपरिषदेने मोहीम राबवून जलपर्णी काढण्याचे काम हाती घेतले. अशातच मासे मृतावस्थेत आढळून येऊ लागले आहे. शहरातील काही हॉटेल तसेच नाल्याचे सांडपाणी तलावात सोडले जात असल्याने पाण्यावर तवंग आला आल्याने मासे मृतावस्थेत आढळून येऊ लागले असावेत असा अंदाज नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे पाण्यावरील तवंग नष्ट करणे गरजेचे आहे. तसेच पाणी खराब होवू नये, आणि पात्रात असलेल्या माश्यांना ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी बोटी फिरवून पाण्याचा तवंग कमी करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक बांधिलकीचे पदाधिकारी रवी जाधव यांनी केली आहे.
सावंतवाडीतील मोती तलावात आढळले मृत मासे
By अनंत खं.जाधव | Published: January 23, 2024 5:09 PM