सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील बैलांच्या झुंजीत एक बैल मृत्युमुखी पावला ही दुर्दैवी घटना आहे. बैलाची झुंज भरवण्याऱ्या आयोजक व स्पर्धकांवर पोलिस प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे. असे कृत्य पुन्हा घडल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असे अतिरिक्त पोलीस अधिक्षक नितीन बगाटे सांगितले.
मालवण तालुक्यातील तळगाव येथे बैल झुंजीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अर्जुन नावाच्या बैलाकडून बाबू नावाच्या बैलाशी झुंज लावण्यात आली होती. मात्र बाबू नावाचा बैलाचा जायबंदी झाल्याने बुधवारी सायंकाळी मृत्यू झाला होता. 'बाबू' बैलाचा मृत्यू झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून या स्पर्धेविरोधात आवाज उठविण्यात आला होता. त्यानंतर युवा फोरम संघटना, प्राणिमित्र संघटनांकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली. यावेळी तातडीने पोलीस प्रशासनाने योग्य ती पावले उचलत बैल झुंजी भरवणाऱ्या आयोजक व मालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.