शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

सिंधुदुर्गातील लाभार्थ्यांना समता सप्ताहात कर्जवाटप

By admin | Published: April 10, 2017 3:59 PM

महामंडळाच्या विविध योजनांची दिली माहिती

आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी, दि. १0 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या दुस-या दिवशी ओरोस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे विविध आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना कर्जाचे वितरण करण्यात आले. यावेळी महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.या कार्यक्रमाचे उद्घाटन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक संचालक जयंत चाचरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अग्रणी बँकेचे व्यवस्थापक किशोर जाधव, श्यामराव पेजे कोकण इतर मागास वर्ग आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक नंदकिशोर साळसकर, संत रोहिदास चर्मोद्योग आर्थिक विकास महामंडळाचे प्रभारी जिल्हा व्यवस्थापक सुनील निकम, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापिका शुभांगी नाईक आदी उपस्थित होते.यावेळी समाजकल्याण विभागाचे सहाय्यक संचालक जयंत चाचरकर यांनी समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. श्यामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजनांची माहिती जिल्हा व्यवस्थापक नंदकिशोर साळसकर यांनी दिली.अग्रणी बँक व्यवस्थापक किशोर जाधव यांनी बँकांच्या विविध योजनांची माहिती दिली. संत रोहिदास चर्मोद्योग आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांची माहिती प्रभारी जिल्हा व्यवस्थापक सुनील निकम यांनी दिली, तर महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांची माहिती जिल्हा व्यवस्थापिका शुभांगी नाईक यांनी दिली.यावेळी महात्मा फुले महामंडळाच्या कर्जयोजनेतून मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना कर्ज वाटप करण्यात आले. दत्तात्रय कदम यांना लाऊड स्पीकर व्यवसायासाठी, स्वप्नील कदम यांना रेडियम आर्ट व्यवसायासाठी, ममता काटकर यांना कपडे विक्री व्यवसायासाठी, सुनील काटदर यांना रेडियम व्यवसायासाठी, तर मनोज काळसेकर यांना मोबाईल शॉपी व्यवसायासाठी अर्थसहाय्य करण्यात आले. प्रास्ताविक विष्णू तेंडोलकर यांनी केले व त्यांनीच आभार मानले.