शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: तावडे आलेल्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
2
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
3
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
4
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
7
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
8
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
9
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
10
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
11
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
12
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
13
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
14
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
16
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
17
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल

ओटवणेत दशक्रोशी पर्यटन महोत्सव

By admin | Published: January 22, 2015 11:24 PM

पालकमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन : २५ जानेवारीपासून सुरूवात

सावंतवाडी : ओटवणे दशक्रोशी विकास समिती आणि डी. के. टुरिझम यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दशक्रोशी पर्यटन महोत्सव २०१५’ चे आयोजन ओटवणे रवळनाथ मंदिर येथे २५ ते २८ जानेवारी या कालावधीत केले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन २५ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती पर्यटनतज्ज्ञ डि. के. सावंत, प्रभाकर गावकर, गजानन सावंत, राजाराम दळवी, प्रकाश दळवी, भाई देऊलकर, दिनानाथ बांदेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. २६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता असनिये जिल्हा परिषद शाळेच्या मुलांचे ‘आदिवासी नृत्य’, जिल्हा परिषद असनिये शाळेच्या मुलांचा दशावतारी नाट्यप्रयोग, ९ वाजता सिंधुदुर्गकन्या जादूगार पूर्वा हिचा जादूच्या प्रयोगांचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी माजी आमदार राजन तेली, उद्योजक पुष्कराज कोले, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष उदय भोसले आदी उपस्थित राहणार आहेत. २७ रोजी सायंकाळी ७.३० वाजता स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये ओटवणे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे टिपरी व धनगरी नृत्य, विलवडे प्राथमिक शाळेचे दशावतारी नाट्य, विलवडे येथील राजा शिवाजी विद्यालयाची एकांकिका, रात्री ९ वाजता संयुजा कलामंच, माजगाव यांच्या ‘अजून शिगमा संपला नाही’ व ‘बिजांकूर’ या एकांकिका, तसेच कालिका प्रासादिक कला मंच, माजगाव यांची ‘प्रवेश दुसरा’ ही एकांकिका असे कार्यक्रम होणार आहेत. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, आरोग्य व शिक्षण सभापती गुरुनाथ पेडणेकर, पंचायत समिती सभापती प्रमोद सावंत, काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब, जिल्हा परिषद सदस्य आत्माराम पालयेकर, माजी सभापती बाळा गावडे आदी उपस्थित राहणार आहेत. २८ रोजी सायंकाळी ७.३० वाजता स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर माजी उपसभापती विनायक दळवी यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा सांगता समारंभ होणार आहे. यावेळी ओटवणे दशक्रोशी विकास समितीचे अध्यक्ष, पदाधिकारी, दशक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित राहणार आहेत. सांगता समारंभानंतर रात्री १० वाजता माऊली दशावतार नाट्यमंडळ, सोनुर्ली प्रस्तुत ‘संत सखूसाठी देव सखू झाला’ हा ट्रिकसिनयुक्त नाट्यप्रयोग होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ओटवणे दशक्रोशी विकास समितीच्यावतीने करण्यात आले आहे. (वार्ताहर)भव्य शोभायात्रा ठरणार आकर्षणउद्घाटन समारंभाला सावंतवाडीचे माजी आमदार जयानंद मठकर, कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक, सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर उपस्थित राहणार आहेत.तत्पूर्वी सकाळी १० वाजता मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराचे उद्घाटन माजी उपसभापती विनायक दळवी यांच्या हस्ते होणार आहे.सायंकाळी विलवडे येथील राजा शिवाजी विद्यालय ते श्री रवळनाथ मंदिर काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेचे उद्घाटन राजमाता भोसले यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये पारंपरिक वेशात बावळाट लेझीम-ढोलपथक, दशावतार, वारक री, चपई नृत्य, शिवाजी मावळे, पर्यावरण दिंडी सादर केली जाणार आहे.