शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

आज फैसला !

By admin | Published: February 22, 2017 10:50 PM

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला : दुपारपर्यंत निकाल अपेक्षित

सिंधुदुर्गनगरी : मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या एकूण १५0 जागांचे निवडणूक निकाल आज, गुरुवारी जाहीर होणार आहेत. सत्ताधारी काँग्रेस, विरोधी गटातील शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अशा चौरंगी लढतीत कोण बाजी मारणार, याकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर या दोघा दिग्गजांमधील सत्तासंघर्षात कोण बाजी मारणार, हे दुपारी एक वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे.मतदान प्रक्रिया झाल्यानंतर गुरुवारी सकाळी १0 वाजल्यापासून मतमोजणीला त्या-त्या तालुक्यात सुरुवात होणार आहे. जिल्हा परिषद आरक्षणामुळे बदललेली राजकीय समीकरणे, आघाडीत झालेली बिघाडी व युतीत पडलेली फूट यामुळेही राजकीय पातळीवर फार मोठी उलथापालथ झाली होती. त्यामुळे गुरुवारी निकाल काय लागतो, याकडे उमेदवारांसह सर्वसामान्य जनतेचेही लक्ष लागून राहिले आहे.जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यात जिल्हा परिषदेच्या ५0 जागांसाठी १७0, तर पंचायत समितीच्या १00 जागांसाठी ३१५ उमेदवार उभे आहेत. एकूण १५0 जागांसाठी ४८५ उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावणार आहेत. ले राजकीय भवितव्य आजमावणार आहेत. जिल्ह्यातील पाच लाख ६३ हजार ६३२ मतदारांपैकी तीन लाख ८0 हजार ७११ मतदारांनी मतदान केले आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पक्षाची कार्यालये, विजयी उमेदवारांच्या रॅलीचे मार्ग यावरही पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. रॅली पूर्व परवानगीशिवाय काढता येणार नाही. बदललेल्या सर्वच राजकीय समीकरणांमधून मतदार कौल कोणाला देतात हे आज, गुरुवारीच समजणार आहे. निकाल काय लागतात, यासाठी उमेदवारांनी देव पाण्यात ठेवले आहेत एवढे मात्र निश्चित.जिल्ह्यात ६७.५५ टक्के मतदान जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यात ६७.५५ टक्के मतदान झाले असून, तीन लाख ८0 हजार ७११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यात सर्वाधिक मतदान वेंगुर्ला तालुक्यात, तर सर्वांत कमी मतदान दोडामार्ग तालुक्यात झाले आहे.जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ५0 जागांसाठी १७0, तर पंचायत समित्यांच्या १00 जागांसाठी ३१५ उमेदवार रिंगणात होते. या उमेदवारांचे भवितव्य जिल्ह्यातील पाच लाख ६३ हजार ६३२ मतदारांच्या हाती होते. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या एकूण १५0 जागांसाठी मंगळवारी (दि. २१) जिल्ह्यात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.