मालवण : मालवण येथील किल्ले सिंधुदुर्गवर गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवराजेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विधिवत पूजा करण्यात आली. किल्ले सिंधुदुर्गच्या विकासासाठी चांदा ते बांदा योजनेतंर्गत निधी तत्काळ उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही केसरकर यांनी दिली.शिवजयंतीनिमित्त पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली. त्यांच्या उपस्थितीत शिवराजेश्वर मंदिरात विधिवत पूजा पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, प्रांताधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी, तहसीलदार समीर घारे, गटविकास अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, पोलिस निरीक्षक विनीत चौधरी, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मंदार गावडे, आकांक्षा शिरपुटे, पंकज सादये, महेंद्र म्हाडगुत, बाबी जोगी, गणेश कुडाळकर, प्रवीण रेवंडकर, प्रवीण लुडबे, आतू फर्नांडिस, अक्षय रेवंडकर, किरण वाळके, तपस्वी मयेकर, अमित भोगले, वायरी भुतनाथ सरपंच भाई ढोके, उपसरपंच संदेश तळगावकर, ग्रामपंचायत सदस्य, सार्वजनिक बांधकामचे प्रकाश चव्हाण, प्रदीप पाटील, संजय गोसावी यांच्यासह अन्य अधिकारी, सादिक शेख, मंगेश सावंत यांच्यासह किल्ल्यातील अन्य रहिवासी, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी शिवराजेश्वर मंदिरचे पुजारी श्रीराम सकपाळ यांच्या हस्ते पालकमंत्री दीपक केसरकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर किल्ल्याच्या तटबंदीवरील शासकीय शिवजयंतीचे ध्वजारोहण केसरकर यांच्या हस्ते झाले.
किल्ला विकासासाठी चांदा ते बांदामधून तत्काळ निधी देणार : दीपक केसरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 5:28 PM
मालवण : मालवण येथील किल्ले सिंधुदुर्गवर गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवराजेश्वर ...
ठळक मुद्देकिल्ला विकासासाठी चांदा ते बांदामधून तत्काळ निधी देणार : दीपक केसरकरकेसरकर, आमदार वैभव नाईक यांनी दिली किल्ले सिंधुदुर्गला भेट