आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी दि. 0२ : माकडतापामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना मदत मिळावी अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे विशेष बाब म्हणून केली होती. त्यानुसार मदत मिळाली असून माकडतापामुळे मृत झालेल्यांचा वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. ही मदत देतानाच मृत्यू व्यक्ती या शेतकरी होत्या त्यामुळे त्यांच्या वारसांना चांदा ते बांदा या योजनेतून कृषी विकासासाठी सुरु करण्यात आलेल्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ देण्याचा आपला प्रयत्न राहील असे पालकमंत्री केसरकर म्हणाले.माकडतापामुळे मृत्यूमुखी झालेल्या लोकांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते १ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. यामध्ये श्रृती देसाई, लक्ष्मण नऊघारे, अजय देसाई, पोर्णिमा सावंत, सुरेश सावंत, लक्ष्मण खरवत, संविधा मांजरेकर, वैजयंती परब, महेंद्र हडपडकर, सुभाष नाईक, दिप्ती नाईक यांना धनादेश वितरीत करण्यात आले.यावेळी उपविभागीय अधिकारी खांडेकर, तहसीलदार सतीश कदम, ग्रामसेवक अमृत सागर, जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, सरपंच शांताराम आकेरकर, उपसरपंच अनुजा सातार्डेकर, तलाठी फिरोज खान, बांदा ग्रामपंचायतेतील ग्राम पंचायत सदस्य, तसेच ग्रांमस्थ उपस्थित होते.
माकडतापामुळे मृत्यूमुखी झालेल्यांच्या वारसांना धनादेश वाटप : दीपक केसरकर
By admin | Published: July 02, 2017 5:11 PM