सुधीर राणेकणकवली : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची बदनामी केली गेली. आदित्य ठाकरेंची बदनामी करण्यासाठी भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा सहभाग होता, असा गंभीर आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. याबाबत कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढत राणे समर्थक व भाजप पदाधिकाऱ्यांना आवाहन केले आहे.केसरकरांच्या टिकेवर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तूर्तास उत्तर देऊ नये असे आवाहन करतानाच त्याबाबत योग्यवेळी भाजप पक्ष योग्य तो निर्णय घेईल असेही नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी म्हटले आहे.प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, राज्यात भाजपा व शिवसेना शिंदे गट हे एकत्र येत स्थापन झालेले सरकार हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र आलेले आहेत. अशावेळी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे यांच्यावर वारंवार टीका करत आहेत. मात्र, भाजपाच्या कोणत्याही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केसरकर यांच्या टीकेला तूर्तास उत्तर देऊ नये. याबाबत योग्य वेळी योग्य तो पक्षाकडून निर्णय घेतला जाईल असे म्हटले आहे.
दीपक केसरकरांची नारायणे राणेंवर टीका, कणकवलीचे नगराध्यक्ष नलावडे म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2022 6:13 PM