शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

दीपक केसरकरांचे विनवणी नाट्य अन् नागरिकांत चर्चा रंगली विसंवादाची 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2023 2:27 PM

सावंतवाडी : सावंतवाडी येथील विविध विकासकामांच्या निमित्ताने आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या ...

सावंतवाडी : सावंतवाडी येथील विविध विकासकामांच्या निमित्ताने आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या घरी डिनर डिप्लोमासी आयोजित केली होती. मात्र कुडाळ येथील कार्यक्रमाला तब्बल दोन तास उशीर झाल्याने डिनर डिप्लोमसीला मुख्यमंत्र्यांनी नकार दिला. चक्क व्यासपीठावरच मंत्री केसरकर यानी मुख्यमंत्र्यांना विनवणी करत असल्याचे दिसून आले. मात्र हा सर्व प्रकार नागरिकांसमोर सुरू असल्याने याची उलटसुलट चर्चा सुरु होती.विविध विकास कामांच्या निमित्ताने प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सावंतवाडीत आले होते. त्याचा मुख्य कार्यक्रम शासन आपल्या दारी हा कुडाळ येथे आयोजित करण्यात आला असल्याने त्या कार्यक्रमाला तब्बल दोन तास उशिर होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी सावंतवाडीतील कार्यक्रम लवकरात लवकर आटोक्यात घेण्यात यावा अशा सूचना सर्वानाच केल्या होत्या.मात्र सावंतवाडी तील कार्यक्रम ही लांबत असल्याने उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सावंतवाडीतील कार्यक्रमातून काढता पाय घेत आणि ते कुडाळ च्या दिशेने रवाना झाले तर मुख्यमंत्र्यांनी ही मंत्री केसरकर यांना कार्यक्रम आटोपता घेऊया असे सांगितले. पण मंत्री केसरकर यांनी काही वेळासाठी घरी या अशी विनंती केली.पण मुख्यमंत्र्यांनी नकार देत लोक थांबले मी आता नाही नंतर येतो असे सांगून मुख्यमंत्र्यांनी येण्यास नकार दिला.केसरकर हे सतत मुख्यमंत्र्यांना विनवणी करत होते आणि मुख्यमंत्री नकार देत होते. हा सर्व प्रकार व्यासपीठावर सुरू होता तर समोरील नागरिक ही हा सर्व प्रकार पाहात असल्याने मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांच्यात विसंवाद आहे कि काय? याचीच चर्चा सर्वत्र सुरू झाली. मात्र मुख्यमंत्र्यांनी अखेर मंत्री केसरकर यांची विनवणी धुडकावून लावत थेट कुडाळच्या कार्यक्रमाला रवाना झाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर Eknath Shindeएकनाथ शिंदे