सावंतवाडी : आदित्य ठाकरे सरकार कोसळण्याची स्वप्ने बघतात. तर आम्ही दिवस-रात्र जनतेसाठी मेहनत घेऊन विकासकामात महाराष्ट्र कसा अग्रेसर होईल याची स्वप्न बघत असतो. कोणी काय स्वप्ने बघावी हाच ज्याचा त्याचा प्रश्न असून कधीतरी येऊन भाषणे दिली म्हणून जनतेची सहानुभूती मिळणार नाही असा टोला राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिवसेना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना लगावला.कोकणची पंढरी म्हणून ओळखली जाणाऱ्या सोनुर्ली येथील माऊली देवीची यात्रा उद्या, मंगळवारी असल्याने आज, मंत्री दीपक केसरकर यांनी सपत्नीक माऊली देवीचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान कमिटीने त्यांचे स्वागत केले.यावेळी मंत्री केसरकर म्हणाले, सावंतवाडी रेल्वे टर्मिनस बाबत लवकरच आम्ही रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेणार असून या भेटीत येथील रेल्वेचे प्रश्न मांडू ते सर्व प्रश्न मार्गी लागतील यांची आम्हाला खात्री असल्याचे ही मंत्री केसरकर म्हणाले.कधीतरी चांगली स्वप्ने बघावीतयावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंनी सरकार 31 डिसेंबर ला कोसळणार असल्याच्या भाकितावरही पलटवार केला. ते पाडण्याची स्वप्ने बघतात. त्यांनी कधीतरी चांगली स्वप्ने बघावीत. आम्ही दिवस रात्र विकास कामांची स्वप्ने बघत असतो. महाराष्ट्र विकास कामात पुढे कसा जाईल हे बघतो. नेहमी राजकारण करायचे नसते. मी अनेक विकासात्मक प्रकल्प मंजूर केले पण मला सतत मतदारसंघात यायला मिळत नाही. याचे वाईट वाटते. त्यामुळे कोण काय बोलतो यापेक्षा कोण चांगले काम करतो हे बघितले पाहिजे असा सल्ला ही त्यांनी दिला.
आदित्य ठाकरेंनी केलेल्या सरकार कोसळणाच्या भाकितावर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
By अनंत खं.जाधव | Published: November 27, 2023 6:08 PM