सिंधुदुर्गनगरी : धारदार शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेल्या आकेरी गावडेवाडी येथील लक्ष्मण मधुकर नाईक (४०) याचा जामीन अर्ज ओरोस येथील जिल्हा न्यायाधीश २ व अतिरिक्त सत्रन्यायाधीश आर. बी. रोटे यांनी फेटाळून लावला आहे.नाईक बंधूंनी आपल्या शेतातील पाण्याचे पाट फोडल्याने ते पाणी पाटील यांच्या घराकडे येत होते. याबाबत तक्रारदार रुपेश कृष्णाजी पाटील यांच्या आईने त्यांना विचारणा केली होती. याचा राग आल्याने रुपेश पाटील हे कामळेवीर बाजारपेठेत असताना लक्ष्मण व परशुराम नाईक यांनी त्यांना झटापट करून शिवीगाळ केली होती. तसेच तेथील एका चुना विक्रेत्याच्या दुकानातील चुना ढवळण्याचे लोखंडी धारदार हत्यार घेऊन लक्ष्मण याने डोक्यावर मारले होते. तर परशुराम याने पाटील यांना धरून ठेवले होते.२१ जुलै २०१९ रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत बाजारपेठेत घडलेल्या या घटनेत गंभीर जखमी झालेल्या रुपेश पाटील यांनी याबाबत कुडाळ पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करून नाईक बंधूंना अटक करण्यात आली होती. २४ जुलैपर्यंत कुडाळ न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर न्यायालयीन कोठडी मंजूर केली होती. दरम्यान, यातील लक्ष्मण नाईक याने जिल्हा व सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता.हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने संशयितास जामीन दिल्यास संंबंधितांवर दबाव येण्याची शक्यता असल्याने जामीन नाकारण्यात यावा, अशी मागणी सरकार पक्षाने केली होती. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिले.
जीवे मारण्याच्या प्रयत्नप्रकरणी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2019 5:03 PM
धारदार शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेल्या आकेरी गावडेवाडी येथील लक्ष्मण मधुकर नाईक (४०) याचा जामीन अर्ज ओरोस येथील जिल्हा न्यायाधीश २ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी फेटाळून लावला आहे.
ठळक मुद्देजीवे मारण्याच्या प्रयत्नप्रकरणी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळलाधारदार शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न