शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
4
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
5
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
6
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
7
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
8
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
9
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
10
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
11
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
12
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
13
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
14
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
15
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
16
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
17
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
18
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
19
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

भानू तायल यांच्या हकालपट्टीची मागणी

By admin | Published: December 14, 2014 9:21 PM

हुसेन दलवाई : कोकण रेल्वेच्या अधोगतीची जबाबदारी तायल यांचीच

चिपळूण : कोकण रेल्वेच्या होणाऱ्या अधोगतीस व्यवस्थापकीय संचालक भानुप्रसाद तायल हेच जबाबदार आहेत. त्यांना हटवल्याशिवाय कोकण रेल्वेला चांगले दिवस येणार नाहीत. त्यांची तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी खासदार हुसेन दलवाई यांनी केली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. गेल्या वर्षभरात कोकण रेल्वे मार्गावर अनेक अपघात झाले आहेत. होणारे अपघात लक्षात घेऊन त्याबाबत कोणतेच ठोस निर्णय घेण्यात आलेले नाहीत. या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचा वेगही मंदावला आहे. तासी ७५ किलोमीटरपेक्षा पुढे या गाड्या धावत नाहीत. गाड्यांच्या वेळाही अनियमित होत असल्याने प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा नेहमीच गोंधळ उडत आहे. कोकण रेल्वेची पीछेहाट होत आहे. नवीन प्रकल्पही रेंगाळले आहेत. या सर्वाला व्यवस्थापकीय संचालक तायल हेच जबाबदार आहेत, असा आरोपही दलवाई यांनी केला आहे. कोकण रेल्वे आणि प्रवाशांच्या समस्यांबाबत आपण रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. त्यांनीही याबाबत लक्ष देऊ, असे आश्वासन दिले आहे. कोकणातील प्रवाशांनाही योग्य न्याय मिळत नाही. शेकडो प्रवाशांना गाडीत बसायलाही जागा मिळत नाही. वारंवार प्रवाशांच्या भावनांचा उद्रेक करावा लागतो. सुविधा पुरविण्यात कोकण रेल्वे प्रशासन अपयशी ठरत आहे, असा आरोपही दलवाई यांनी केला. त्यामुळे कोकणातून आणखी एखादी लोकल गाडी सुरू करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)