रत्नागिरी : फळमाशीचे कारण देत युरोपीय देशांनी गतवर्षी आंबा आयातीवर बंदी घातली होती. यावर्षी परदेशातून आंब्याला मागणी असूनही उत्पादनाअभावी निर्यातीवर परिणाम झाला आहे. रत्नागिरी पणन विभागाकडे ५०० किलो आंबा युरोपला पाठवण्यासाठी दाखल झाला आहे. बाष्पजल प्रक्रियेसाठी हा आंबा उद्या (शनिवारी) मुंबई येथे पाठविण्यात येणार आहे.युरोपीय देशांनी यावर्षी काही अटी ठेवून निर्यातीवरील बंदी उठविली आहे. निर्यातीसाठी उष्णजल प्रक्रियेस मान्यता देण्यात आली होती. मात्र, अद्याप संशोधन पूर्ण होऊ शकलेले नसल्याने बाष्पजल प्रक्रियेस मान्यता देण्यात आली आहे. वाशी येथे बाष्पजल प्रक्रिया युनिट आहे. वाशीतून युरोपला आंबा पाठवताना बाष्पजल प्रक्रिया करून पाठविली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून दत्तात्रय दामले यांची पहिली ५०० किलोची कन्साईटमेंट मुंबईकडे शनिवारी रवाना होणार आहे. आंबा सध्या रत्नागिरी पणन मंडळाकडे असून तो अर्धवट पिकवून पाठवायचा असल्याने उद्यापर्यंत आंबा ठेवण्यात येणार आहे.आंबा हे भारतातील नगदी पीक असून, राष्ट्रीय फळ म्हणून आळखले जाते. कोकणातील आंब्याची हापूस जात जगामध्ये सर्वोत्कृष्ट आहे. फळाची गोडी, चव, स्वाद, रंग, आकार आदी गुणवैशिष्ट्यांमुळे स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर ही जात लोकप्रिय आहे. आंब्यावर ४८ अंश सेल्सियस उष्णजल प्रक्रिया एक तास केल्यास फळमाशीच्या अळ्या मरून जातात, असे मत संशोधकांनी वर्तविले होते. बैंगनपल्ली, बदामी, तोतापुरी, केशरसारख्या जातीच्या आंब्याची साल जाड असल्याने या आंब्यासाठी संबंधित प्रक्रिया योग्य आहे. मात्र, हापूस आंब्याची साल पातळ असल्याने संबंधित प्रक्रियेमुळे हापूसच्या दर्जावर परिणाम होण्याची शक्यता आहे.वास्तविक आंब्यावर १५ एप्रिलनंतर फळमाशीचा प्रादुर्भाव होतो. परंतु यासंबंधी तातडीने अहवाल पाठवण्यासाठी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरू करण्यात आले आहे. परंतु सध्या अवकाळीतून वाचलेला आंबा शेतकऱ्यांनी बाजारपेठेत पाठवण्यास सुरूवात केली आहे. परंतु उष्णजलचा अहवाल प्राप्त होण्यास उशीर झाल्याने बाष्पजल प्रक्रियेस मान्यता देण्यात आली आहे. बाष्पजल प्रक्रियेमध्ये साडेसत्तेचाळीस अंश सेल्सियस इतके तापमान आंब्याला दिले जाते. नंतर थंड पाण्याव्दारे हळूहळू तापमान खाली आणले जाते. त्यामुळे फळमाशीच्या अळ्या मरून जातात. वाशी मार्केटमधील ४०० डझन आंबा विकत घेऊन त्यावर उष्णजल प्रक्रिया करून आंबा युरोपीय देशात पाठवण्यात आला होता.मॉरिशस, न्युझीलंड, युरोप, अमेरिका, जपान आदी देशातून आंब्याला मागणी होत आहे. मात्र, अवकाळीमुळे जिल्ह्यातील २० हजार ५१८.३० हेक्टर क्षेत्रावरील आंबा पीक नष्ट झाले. शिवाय अद्याप अधूनमधून पडत असलेल्या पावसामुळेही आंबा पिकावर परिणाम होत आहे. त्यामुळे निर्यातीला मागणी असूनही शेतकरी पुरवठा करण्यास असमर्थ ठरत आहेत. यंदा अवकाळी पाऊस, बदलते वातावरण यामुळे हापूस व्यवसाय अडचणीत आल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)रत्नागिरी जिल्ह्यातून गेल्या दहा वर्षात निर्यात करण्यात आलेल्या आंबा पिकाची आकडेवारी (मेट्रिक टनमध्ये) पुढीलप्रमाणे : वर्षनिर्यात२००५-०६९.५२००६-०७ -२००७-०८४०.८२२००८-०९८४.५२२०१०-११११.०९२०११-१२१६.८२०१२-१३१८२०१३-१४१५.६४३
हापूसची मागणीत वट, पण उत्पादनात घट
By admin | Published: April 17, 2015 10:56 PM