शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
3
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
4
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती
5
UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही
6
IAS अधिकाऱ्याला मिठाईच्या बॉक्समधून लाच देणं नेत्याला पडलं महागात, पोलीस आले अन्....
7
सर्वोच्च न्यायालयाचा मदरशांना मोठा दिलासा, मदरसा कायदा घटनात्मक घोषित; हायकोर्टाचा निर्णय फिरला
8
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
9
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
10
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
11
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
12
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
13
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
14
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
15
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
16
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
17
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
18
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
19
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
20
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता

रशियामध्ये हापूसची मागणी वाढतीच

By admin | Published: May 19, 2017 11:23 PM

रशियामध्ये हापूसची मागणी वाढतीच

मेहरुन नाकाडे । लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : ‘मँगोनेट’ प्रणालीद्वारे जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांचा आंबा आतापर्यंत कुवेत व रशियामध्ये निर्यात झाला आहे. गेल्या आठवड्यापर्यंत ४ हजार ७७३ किलो आंबा निर्यात करण्यात आला होता. शुक्रवारी आणखी १ हजार १२८ मेट्रीक टन आंबा निर्यात झाल्याने आतापर्यंत झालेल्या निर्यातीचा आकडा ५ हजार ९०१ मेट्रीक टन झाला आहे. कुवेत, रशियाकडून हापूसची मागणी वाढतच असून, नियमित पाऊस सुरू होईपर्यत आंबा निर्यात सुरू राहणार आहे.मँगोनेट प्रणालीअंतर्गत जिल्ह्यातील २०४३ आंबा बागांची नोंदणी करण्यात आली आहे. यावर्षी थेट रशिया व कुवेतसाठी हापूसला मागणी आल्याने आंबा निर्यात करण्यात आला आहे. अनिकेत हर्षे (नेवरे, ता. रत्नागिरी), डॉ. खलिफे (राजापूर) आणि सचिन लांजेकर (रत्नागिरी) यांच्या बागेतील आंबा कुवेत व रशियामध्ये निर्यात झाला आहे. रशियामध्ये आंबा निर्यातीसाठी वजनाची अट निश्चित करण्यात आली आहे. २७० ग्रॅमपेक्षा अधिक वजनाचे फळ निर्यातीसाठी ग्राह्य धरण्यात येत आहे. त्यामुळे किलोला चार फळे बसत आहेत. निर्यातीपूर्वी केवळ फायटो सॅनिटरी प्रक्रिया करण्यात येत आहे. आतापर्यंत रत्नागिरीतून प्रथमच कुवेत व रशियामध्ये आंबा निर्यात झाला आहे. सुरळीत निर्यात प्रक्रिया व उच्च दर यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. सध्यातरी बाष्पजल प्रक्रिया निर्यातीच्या आंब्यावर सुरू आहे. ही सुविधा मुंबईत उपलब्ध आहे. रत्नागिरी व जामसंडे (सिंधुदुर्ग) येथे उष्णजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात आली आहेत. परदेशात आंबा निर्यात करण्यासाठी व्यापारी रत्नागिरीत येत असले तरी त्यांना आंबा खरेदी, बाष्पजल प्रक्रिया, पॅकिंग, वाहतूक खर्च परवडत नसल्यामुळे त्यांची संख्या घटली आहे. व्यापाऱ्यांनी पहिल्यांदा मार्च अखेरीस आंबा खरेदी केला. त्यानंतर टप्याटप्याने चार कन्साईटमेंट कुवेत व चार कन्साईटमेंट रशियासाठी पाठविण्यात आल्या आहेत. कुवेत, रशियाकडून आंब्याला चांगली मागणी आहे. कुवेत येथे २ हजार १५४ मेट्रीक टन, तर रशियामध्ये ३ हजार ४४७ मेट्रीक टन आंबा निर्यात करण्यात आला. पाऊस सुरू होईपर्यंत दोन्ही देशांतून हापूसला मागणी आहे.वाशी मार्केटमधून आंब्याची निर्यात सुरू आहे. निर्यातीपूर्वीच्या सर्व प्रक्रिया मुंबईत एकाच छताखाली होत असल्याने निर्यातदारांना सोपे झाले आहे. कुवेत व रशियाला आंबा निर्यात करण्यासाठी बाष्पजल किंवा उष्णजल प्रक्रिया करावी लागत नसल्यामुळे केवळ फायटो सॅनिटरी प्रक्रिया करण्यात येत आहे. सध्या मुंबई मार्केटमध्ये १०० ते २०० रुपये डझन दराने आंबा विक्री सुरू आहे, तर स्थानिक बाजारपेठेत १२५ ते ३५० रुपये डझने दराने आंबा विकला जात आहे. कुवेत, रशियामध्ये जाणाऱ्या आंब्याला मात्र मोठा भाव मिळाला आहे. पावसाळा तोंडावर असला तरी आंब्याच्या निर्यातीत वाढ होण्याची शक्यता आहे. यावर्षीपासून मँगोनेटद्वारे कुवेत व रशियाची बाजारपेठ खुली झाली आहे. भविष्यात अन्य देशांत निर्यात वाढण्याची शक्यता आहे.उष्णजल प्रक्रिया अजून थंडचयुरोपीय देशांनी फळमाशीचे कारण देत आंबा निर्यातीवर बंदी आणली होती. निर्यात प्रक्रिया सुरू करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू असतानाच उष्णजलचा पर्याय ठेवण्यात आला. विविध तापमानात आंब्याची चाचणी घेण्यात आली. ४७ अंश सेल्सियस तापमानात ५० मिनिटे प्रक्रिया केली तर आंबा खराब होत नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. तसा अहवाल अपेडाकडे सादर करण्यात आला. अपेडाने मान्यता दिली, परंतु त्यानंतर तो अहवाल पुढे फरिदाबाद येथील नॅशनल प्लॅन प्रोटेक्शन आॅर्गनायझेशनकडे पाठविण्यात आला. मात्र, तेथील मान्यता अद्याप रखडली आहे.काय आहे मँगोनेट?दर्जेदार आंब्याची परदेशामध्ये थेट निर्यात होऊन शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा यासाठी २०१५ मध्ये मँगोनेट प्रणाली सुरू करण्यात आली. दोन वर्षे मँगोनेटद्वारे आंबा निर्यात झाला नाही. यावर्षी मँगोनेट अंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांकडे परदेशातील व्यापाऱ्यांनी थेट संपर्क साधून आंबा खरेदी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक व मुंबई मार्केटपेक्षा चांगला दर उपलब्ध होत आहे.