आरोंदा : जोरदार पावसामुळे मळेवाड-भटवाडी कॉजवेवर पाणी आल्याने पूर्ण दिवस कॉजवेवरील वाहतूक बंद होती. या कॉजवेवरील उंची वाढवावी, अशी वारंवार मागणी होत असतानाही याकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होते.शुक्रवारी मळेवाड परिसरात जोरदार झालेल्या पावसामुळे सकाळपासूनच भटवाडी कॉजवेवर पाणी आले होते. त्यामुळे भटवाडीतील ग्रामस्थांना मुख्य रस्त्यावर येण्यासाठी भटवाडी-शिरसाटवाडी किंवा वरची मळेवाड खेमराज पुलाचा आधार घ्यावा लागला.
पावसाळ््यात मळेवाड नदीला वारंवार पूर येत असल्याने भटवाडी व राणेवाडी कॉजवेवर पाणी असते. त्यामुळे या दोन्ही वाड्यांतील लोकांना मुख्य रस्त्यावर येण्यास अडथळा निर्माण होतो. या कॉजवेची उंची वाढवून दिलासा देण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.