सावंतवाडी - पैसे मागणारे, आमच्यावर खोके घेतल्याचा आरोप करतात, मी आरोप केल्यानंतर त्याचे उत्तर ते देऊ शकले नाही आमच्याकडे काहीच नाही फक्त जनतेचे प्रेम आहे. त्यांच्याकडे काय आहे? याचे उत्तर त्यांनीच जनतेला द्यावे, असा टोला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी त्यांनी काही लोकांकडे दुर्लक्ष केलेले चांगले असते तसं शिकलं पाहिजे, असा टोला सावंतवाडीतील विकास कामाची भूमिपूजन करणाऱ्या भाजपच्या राजन तेली यांचे नाव न घेता लगावला. सावंतवाडी शहरात शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन काही भूमिपूजन करण्यात येणार होती परंतु भाजप नेते आमदार राजन तेली यांनी मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन करण्यापूर्वी त्या ठिकाणी आपण जाऊन उद्घाटन केले.
याबाबत केसरकर यांना विचारले असता ते म्हणाले, काही लोकांकडे दुर्लक्ष केलेले चांगले असते जसे राज्यात संजय राऊत आहेत तसेच जिल्ह्यात काही लोकांकडे दुर्लक्ष केला पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली. आमच्यावर पैसे घेतल्याचा आरोप करतात. परंतु मी प्रत्यारोप केल्यानंतर साधे उत्तर सुद्धा त्यांना देता आले नाही. या ठिकाणी माझ्यावर खोके घेतला चा आरोप झाला. परंतु ज्यांनी पैसे घेतले तेच आरोप करतात हे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.
याबाबत जनतेने आता समजून घ्यावे माझ्यावर कितीही कर्जाचा बोजा झाला तरी मी चेकच्या माध्यमातून पैसे देतो. माझी तीन पिढ्यांची श्रीमंती आहे. त्यामुळे माझ्यावर बोलणाऱ्यांनी, लिहिणाऱ्यांनी भान ठेवून बोलावे, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.तसेच वेळ आल्यावर आणखी बोलू असे सागितले.