शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

खेडमध्ये चौघांना डेंग्यूची लागण

By admin | Published: April 20, 2017 12:04 AM

खेडमध्ये चौघांना डेंग्यूची लागण

खेड : खेड तालुक्यातील कुळवंडी जांभूळगाव येथील २२ जणांना तापाची लागण झाली असून, त्यातील चारजण डेंग्यूबाधित असल्याचा अहवाल जिल्हा आरोग्य विभागाने दिला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या चौघांवर कळंबणी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.संचिता गणपत जाधव (वय ४०), मधुकर गंगाराम निकम (६२), सानिका अरविंद निकम (१४), अनुष्का भरत निकम (१०) अशी डेंग्यूबाधितांची नावे आहेत. कुळवंडी जांभुळगावात ८२ घरे आहेत. यातील बहुतांश गावातील लोक नोकरीनिमित्त बाहेरगावी आहेत. घरातील शौचालयाच्या तसेच टाकीमध्ये साचलेल्या पाण्यामध्ये डासांची पैदास झाल्याने वाडीमध्ये गेले पाच दिवस तापाची साथ पसरल्याचा अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला. त्यामुळे येथील जवळपास २२ ग्रामस्थांना या तापाची लागण झाली आहे.तालुका आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. एस. अभिवंत यांच्या मार्गदर्शनाखाली या रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. आता या सर्वांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मात्र, यातील सहा रुग्णांना तपासल्यानंतर त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचा संशय येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना आला. त्यामुळे या रुग्णांना कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या सर्वांचे रक्ताचे नमुने मंगळवारी रत्नागिरी जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचे अहवाल प्राप्त झाले असून, सहा पैकी चारजणांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या रुग्णांवर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. (प्रतिनिधी)