बागायत : जिल्हा परिषद अध्यक्ष या नात्याने मिळालेला वर्षभराचा कालावधी कमी नसला तरी जास्तसुद्धा नाही. यापूर्वीच्या जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून चांगले काम झाले आहे. परंतु व्यक्ती बदलली की, काम करण्याची कार्यपद्धती बदलते. त्यामुळे यापुढील कालावधीमध्ये पदाधिकारी, अधिकारी व विरोधी पक्षांच्या समन्वयातून पक्षीय निष्ठा कायम ठेवत सिंधुदुर्गच्या विकासाचा नवीन पॅटर्न माजी मुख्यमंत्री नारायण राणे व आमदार नीतेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांनी मसुरे डांगमोडे येथे केले.मसुरे डांगमोडे येथील नवतरुण मित्रमंडळाच्या वतीने डांगमोडे गावचे सुपुत्र पंचायत समितीचे उपसभापती छोटू ठाकूर यांचा सत्कार केला. यावेळी ते बोलत होते. यावेळी कॉँग्रेस तालुकाध्यक्ष मंदार केणी, युवक कॉँग्रेसचे बाबा परब, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, सरपंच लक्ष्मी पेडणेकर, उपसरपंच राहुल परब, अॅड. उल्हास कुलकर्णी, मालोंड सरपंच जितेंद्र परब, डहाणू नगरसेविका आरती ठाकूर, माजी सरपंच गायत्री ठाकूर, उद्योजक संदेश ठाकूर, महेश बागवे, अशोक बागवे, विलास मेस्त्री, डॉ. आशीर्वाद ठाकूर, मनोहर ठाकूर, रमेश ठाकूर, प्रकाश ठाकूर, नारायण ठाकूर, बाळप्रकाश ठाकूर, आदी उपस्थित होते.यावेळी मंदार केणी म्हणाले, मसुरे गावामध्ये सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी जसे एकत्र दिसून येतात, तशा प्रकारचे दृश्य इतर ठिकाणी दिसून येत नाही. त्यामुळेच दोन्ही महत्त्वाची पदे या गावाला मिळाली आहेत. कॉँग्रेसच्या माध्यमातून यापुढेही या ठिकाणी विकासाची कामे चालूच राहतील. अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी आशीर्वाद ठाकूर, रमेश ठाकूर, अॅड. कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. यावेळी अर्जुन ठाकूर, रतन ठाकूर, अनिल ठाकूर, कमलेश ठाकूर, मंगेश ठाकूर, रवींद्र ठाकूर, परशुराम ठाकूर, संतोष ठाकूर, महेश ठाकूर, व्यंकटेश ठाकूर, स्वप्निल ठाकूर, अविनाश ठाकूर, पांडुरंग ठाकूर, परशुराम चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य समीर ठाकूर, समीर कदम, राजेंद्र ठाकूर, आबा ठाकूर, मंडळाचे कार्यकर्ते, सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. संदेश ठाकूर यांनी स्वागत, तर बाळप्रकाश ठाकूर यांनी आभार मानले. (वार्ताहर)
जिल्ह्याच्या विकासासाठी नवा पॅटर्न राबविणार
By admin | Published: March 21, 2016 9:00 PM