शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

विकास आराखडा समुद्रात बुडविला

By admin | Published: September 13, 2015 9:38 PM

मालवण शहरवासीयांकडून निषेध : प्रत्येक प्रभागात बैठका घेऊन करताहेत विरोध

मालवण : मालवण शहर विकास आराखड्याविरोधात नागरिकांमधून विरोधाची धार तीव्र बनत चालली आहे. आराखड्याविरोधात संताप व्यक्त करत शहरात ठिकठिकाणी सभा घेतल्या जात आहेत. रविवारी धुरीवाडा येथील नागरिकांनी या अन्याकारक विकास आराखड्याचा निषेध व्यक्त करत आराखड्याच्या प्रती समुद्रात बुडवल्या. नागरिकांची घरे जमिनी यावरून रस्ते जाणार असतील. अवास्तव आरक्षणे राहणार असतील तर असा विकास हवाच कशाला? असा संतप्त सवाल व्यक्त करत अशा शहर विकासास आमचा तीव्र विरोध राहील अशी आक्रमक भूमिका येथील नागरिकांनी घेतली. मालवण शहर विकास आराखड्यास शहरवासीयांचा तीव्र विरोध सुरु आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात नागरिक बैठका घेऊन या आराखड्यास विरोध करत आहेत. नगरपरिषदेतील काँग्रेस सत्ताधिकारी शहर विकास आघाडी व भाजपा यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. सर्व पक्षीयांकडून जनतेच्या माथी अन्यायकारक असा हा विकास आराखडा जनतेवर लादला जाणार नाही अशीही भूमिका मांडली जात आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनीही या आराखड्याबाबत भूमिका स्पष्ट करताना मालवण शहरवासीयांच्यामागे आपण व काँग्रेस पक्ष ठाम असल्याचे सांगत प्रसंगी शासनस्तरावर या आराखड्यास आपण विरोध करू अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आराखड्यावरून मालवण शहराचे वातावरण चांगलेच तापले आहे.रविवारी धुरीवाडा येथील नागरिकांची श्रीकृष्ण मंदिरात बैठक पार पडली. यावेळी विजू केनवडेकर, विकी तोरस्कर, भाई कासवकर, बाबी जोगी यासह धुरीवाडा येथील नागरिक उपस्थित होते.चीवला बीच येथे गाड्या पार्किंगचे आरक्षण टाकण्यात आले आहे. त्याठिकाणी मच्छिमारांच्या होड्या उभ्या करण्यात येतात, मासळी उतरवली जाते. ते आरक्षण उठवले नाही तर पारंपरिक मच्छिमार विस्थापित होतील. यासाठी हा अन्यायकारक आराखडा समुद्रात बुडवायला हवा असे तोरसकर यांनी सांगितले. त्याला नागरिकांनी पाठींबा देत या अन्यायकारक आराखड्याचा निषेध करून आराखडा समुद्रात बुडवला. (प्रतिनिधी)१५ सप्टेंबर रोजी नगरपरिषदेवर मोर्चा शहरात ८२ आरक्षणे टाकण्यात आली आहेत. तर गल्लीतले रस्ते हे १२ मीटर दाखवण्यात आले आहेत. १२ मीटर रस्ते घेतले गेल्यास नागरिकांची घरे जाणार आहेत. नागरिकांनी याला तीव्र विरोध करून हरकती घेतल्या पाहिजेत. त्यासाठी १५ रोजी नगरपरिषदेवर काढण्यात येणाऱ्या मोर्चास नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केनवडेकर यांनी केले. तर हा आराखडा अन्यायकारक असून नागरिकांना विस्थापित करणारा आहे.