शहरं
Join us  
Trending Stories
1
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!
2
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
3
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना आजपासून; खेळपट्टी ठरवणार कसोटी मालिकेचे भवितव्य
4
विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता
5
परस्परांविरोधात प्रचार करणार? संदीप नाईक यांच्या उमेदवारीमुळे गणेश नाईकांपुढे पेच
6
ठाणे मतदारसंघात शिंदेसेनेची भाजपच्या विरोधात बंडखोरी; पाचपाखाडी मतदारसंघावर दावा
7
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
8
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
9
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
10
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
11
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
12
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
13
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
14
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
15
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
16
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
17
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
19
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
20
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार

देवगड हापूस आंब्याच्या मोहरावर आता फळमाशीचे नवे संकट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 1:42 PM

फळमाशीवर वेळीच संशोधन होऊन कृषी विभागाने लक्ष देऊन औषधांचे संशोधन करणे गरजेचे

अयोध्याप्रसाद गावकरदेवगड : देवगड हापूस आंब्यावर  नवीन येणारी संकटे आणि त्यामधील कृषी विभागाचा नाकर्तेपणा आंबा बागायतदारांच्या मुळाशी येऊन ठेपला आहे. आंबा मोहरावर २० वर्षांपूर्वी खार या चिकट द्रव्याने थैमान घालून आंबा मोहराचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले होते. यानंतर थ्रीप्सने बागायतदारांना हतबल केले होते. या दोन्ही रोगांवर नवनवीन औषधे आल्याने ते नियंत्रणामध्ये आले. मात्र आता पुन्हा एकदा अवकाळी पावसामुळे फळमाशीचे संकट निर्माण झाले आहे. यामुळे आंबा बागायतदारांसमोर नवीन संकटच उभे राहिले आहे.अनेक प्रकारच्या रोगामुळेच महागडी कीटकनाशके बागायतदारांना फवारणी करावी लागत होती. यामुळे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त अशी अवस्था आंबा बागायतदारांची थ्रीप्स या रोगाने केली होती. आता थ्रीप्सवर देखील अनेक औषधे निर्माण झाल्याने हा रोग आटोक्यात येत असताना पुन्हा आंबा बागायतदारांसमोर फळमाशी हे मोठे संकट गेल्यावर्षीपासून उभे येऊन ठेपले आहे. या फळमाशीचा याहीवर्षी प्रादुर्भाव निर्माण झाला तर कोणती औषधे कृषी विभागाकडून संशोधन करून निर्माण केली जातात. याकडे बागायतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.वेळीच संशोधन करणे गरजेचेफळमाशी ही अवकाळी पावसामुळे निर्माण झाली आहे. गेल्यावर्षी मोहर आल्यानंतर डिसेंबर ते मार्च महिन्यांमध्ये अधूनमधून अवकाळी पाऊस पडत राहिल्यामुळे फळमाशीचा प्रादुर्भाव वाढला होता. या फळमाशीवर वेळीच संशोधन होऊन कृषी विभागाने लक्ष देऊन औषधांचे संशोधन करणे गरजेचे आहे. या फळमाशीचा आंबा पिकाबरोबर केळी, चिकू व अन्य फळांवर देवगड तालुक्यामध्ये परिणाम दिसून आला होता. त्यामुळे कृषी विभागाने याकडे लक्ष देणे गरजेेचे आहे.कोकणातील बागायतदार देताहेत एकाकी झुंजखार, थ्रीप्स या आंबा पीक नष्ट करणाऱ्या रोगानंतर फळमाशीचे संकट आंबा बागायतदारांसमोर येऊन ठेपले असताना याकडे राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे कोकणातील बागायतदारांना एकाकी झुंज द्यावी लागत आहे. आंबा बागायतदारांचे प्रश्न विधानसभेमध्ये चर्चिले जाणे महत्त्वाचे आहे. मात्र, राजकीय इच्छाशक्तीच कोकणातील शेतकऱ्यांना कमी पडत आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा येथील शेतकऱ्यांच्या बाजूने तेथील लोकप्रतिनिधी नेहमीच उभे राहतात.

देवगड तालुक्यामध्ये विजयदुर्ग, गिर्ये येथे कोकण कृषी विद्यापीठाचे रामेश्वर फळ संशोधन उपकेंद्र आहे. मात्र, या संशोधन केंद्राच्या माध्यमातून बागायतदारांच्या फळांवर येणाऱ्या रोगांचे संशोधनच केले जात नाही. त्यामुळे दिखावूपणामध्ये असलेले फळसंशोधन केंद्र शेतकऱ्यांचे हित जोपासत नसेल तर हे केंद्र शोभेचेच कित्येक वर्षापासून ठरत आहे

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMangoआंबाFarmerशेतकरी