शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

धामापूरचा बोटिंग प्रकल्प पुन्हा सुरू

By admin | Published: March 22, 2015 10:29 PM

पर्यटकांचे आकर्षण : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रारंभ; बोटींची नादुरुस्ती आणि तरंगत्या जेटीच्या समस्या झाल्या दूर

चौके : मालवण तालुक्यातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या धामापूर तलावातील इको फ्रेंडली बोटिंग प्रकल्प बोटिंच्या नादुरुस्तीमुळे आणि तरंगत्या जेटीच्या समस्येमुळे वर्षभर पूर्णपणे बंद होता. हा प्रकल्प माजी आमदार सुभाष चव्हाण यांच्या प्रयत्नातून २१ मार्चला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुन्हा दुरुस्ती करून पर्यटकांसाठी सुरू करण्यात आला. याचा प्रारंभ धामापूरमधील उद्योजक शिरीष देसाई यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला.यावेळी काँग्रेसचे माजी आमदार सुभाष चव्हाण, धामापूर सरपंच मानसी धामापूरकर, भक्ताई स्वयंरोजगार सहकारी संस्था धामापूरचे अध्यक्ष तुषार धामापूरकर, प्रकल्प समन्वयक महेश धामापूरकर, ग्रामस्थ नंदकिशोर परब, बापू देसाई, संदीप राऊळ, ओंकार मेस्त्री, आत्माराम धामापूरकर, सीताराम धामापूरकर, सागर धामापूरकर, आदी उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाल्यानंतर धामापूर तलाव आणि परिसर निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्धीस आले. त्यावेळी तत्कालीन काँग्रेसचे आमदार सुभाष चव्हाण तसेच पालकमंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नातून लाखो रुपये किमतीचा इको फ्रेंडली बोटिंग प्रकल्प सन २०१० मध्ये सुरू करण्यात आला. सुरुवातीची तीन वर्षे हा प्रकल्प अजिंक्य अ‍ॅडव्हेंचर अँड हेल्प आॅर्गनायझेशन या संस्थेकडे चालविण्यासाठी देण्यात आला. त्यावेळी तरंगती जेटी पॅडल बोटी, मोटरबोटी सुस्थितीत असल्यामुळे बोटिंग सेवा सुरळीत चालली. तसेच याला पर्यटकांनीही चांगला प्रतिसाद देऊन संस्थेने उत्पन्नही चांगले मिळविले. परंतु, त्या तुलनेत बोटिंची निगा न राखल्यामुळे अजिंक्य अ‍ॅडव्हेंचरचा तीन वर्षांचा करार संपल्यानंतर या बोटिंग प्रकल्पाला खऱ्या अर्थाने उतरती कळा लागली. यावेळीही सुभाष चव्हाण यांनी पुढाकार घेऊन बोटींच्या दुरुस्तीसाठी वैयक्तिकरित्या खर्च करून हा प्रकल्प धामापुरातील स्थानिक तरुणांच्या भक्ताई स्वयंरोजगार सहकारी संस्था धामापूर या संस्थेकडे दोन वर्षांपूर्वी चालविण्यास देण्यात आला. या संस्थेने पर्यटकांना एक हंगाम बोटिंग सेवा उपलब्ध करून दिली. परंतु, पावसाळ्यानंतर पुन्हा हा प्रकल्प बोटींच्या नादुरुस्तीमुळे बंद अवस्थेत होता. तसेच तरंगत्या जेटीचीही समस्या निर्माण झाली होती. (वार्ताहर)चौकट-फॅमिलीसाठी मोटारबोट लवकरच सुरू करणारयावेळीही पुन्हा सुभाष चव्हाण यांनी पुढाकार घेऊन बोटींच्या दुरुस्तीसाठी एक लाख रुपये देऊन पाच पॅडलबोट पुन्हा सुरू करून घेतल्या आणि तरंगती जेटी जोडून घेऊन पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय असलेली इको फ्रेंडली बोटिंग सेवा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुन्हा सुरु करून घेतली. त्याचप्रमाणे अजून एक पॅडलबोट आणि फॅमिलीसाठी असणाऱ्या दोन बॅटरीवर चालणाऱ्या मोटारबोटी येत्या १५ दिवसांत सुरु करण्यात येतील, अशी माहिती प्रकल्प समन्वयक महेश धामापूरकर यांनी यावेळी दिली.