सिंधुदुर्गनगरी : एकच मिशन जुनी पेन्शन... कोण म्हणतेय देणार नाय... प्राथमिक शिक्षक संघाचा विजय असो आदी विविध गगनभेदी घोषणा देत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन छेडले. तसेच २० जानेवारीला आझाद मैदानावर आंदोलन छेडण्याचा निर्धारही केला. यावेळी या संघटनेने केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील जुन्या भाजपा सरकारवर नाराजी व्यक्त केली.जुनी पेन्शन योजनेसह शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने पुकारलेल्या राज्यव्यापी धरणे आंदोलनात सहभागी होत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने माजी राज्याध्यक्ष प्रकाश दळवी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले.यावेळी राज्य संयुक्त चिटणीस महादेव देसाई, जिल्हाध्यक्ष के. टी. चव्हाण, गुरुदास कुबल, विजय केळकर, स्वप्नाली सावंत, नागेश गावडे यांच्यासह अनेक शिक्षक उपस्थित होते.अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ ही अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची संलग्न संघटना आहे. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या २२ सप्टेंबर रोजी लखनऊ येथे झालेल्या बैठकीत २० डिसेंबरपर्यंत या प्रश्नाची सोडवणूक न झाल्यास प्रत्येक जिल्हा मुख्यालय येथे धरणे आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला होता.दरम्यानच्या कालावधीत प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र अनेक वेळा निवेदन देऊनही प्रश्न जैसे थे स्थितीत असल्याने हे आंदोलन छेडण्यात आले असल्याचे राज्य संयुक्त चिटणीस महादेव देसाई यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले.आता आझाद मैदानावर आंदोलन करणारशनिवारी जिल्हास्तरावर छेडण्यात आलेल्या या आंदोलनानंतर १८ जानेवारी २०२० पर्यंत मागण्या आणि समस्या व प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास २० जानेवारी रोजी आझाद मैदान-मुंबई येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही महादेव देसाई यांनी सांगितले.शिक्षकांची फसवणूकआपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी छेडण्यात आलेल्या आंदोलनात मार्गदर्शन करताना महादेव देसाई यांनी केंद्रातील आणि राज्यातील गत भाजपा सरकारवर नाराजी व्यक्त केली. तसेच शिक्षकांची फसवणूक केल्यानेच भाजपाला विरोधी पक्षात बसावे लागले असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्राथमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन, विविध मागण्यांसाठी प्रशासनाचे वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 5:05 PM
एकच मिशन जुनी पेन्शन... कोण म्हणतेय देणार नाय... प्राथमिक शिक्षक संघाचा विजय असो आदी विविध गगनभेदी घोषणा देत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन छेडले.
ठळक मुद्देप्राथमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन, विविध मागण्यांसाठी प्रशासनाचे वेधले लक्ष केंद्रातील भाजप सरकारवर नाराजी