शहरं
Join us  
Trending Stories
1
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
2
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळविरांनी..."
3
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
4
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
5
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
6
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
7
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत
8
“वाढत्या लोकप्रियतेमुळेच घाबरलेल्या भाजपाकडून राहुल गांधींना धमक्या”; काँग्रेसची टीका
9
मोसादही पाहत राहिल... ना मिसाईल, ना बाँब; घातक एनर्जी वेव्हजचे शस्त्र भारताच्या हाती लागणार
10
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
11
नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, पीएम विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमाची वर्ध्यात जोरदार तयारी
12
बिहारचे मराठमोळे, दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; एवढे काय घडले?
13
Kolkata Doctor Case : संदीप घोष, अभिजित मंडलच्या मोबाईलमध्ये दडली आहेत अनेक गुपितं; CBI चा मोठा दावा
14
भारतात कुठे वापरले जातात सर्वाधिक कंडोम? राज्याचं नाव जाणून थक्क व्हाल!
15
"पापा कहते हैं, "बड़ा नाम करेगा"; R Ashwin च्या वडिलांनी एन्जॉय केली लेकाची फटकेबाजी
16
‘’राहुल गांधींना जीवे मारणारी धमकी सहन करणार नाही; ‘ईंट का जवाब पत्थर से देंगे’’, नाना पटोले यांचा इशारा   
17
'बलात्कार, व्हिडीओ अन् दुसऱ्यांसोबत ठेवायला लावले संबंध'; भाजपा आमदारावर गुन्हा
18
"राहुल गांधी यांना १०० वेळा दहशतवादी म्हणेन’’, रवनीत सिंग बिट्टू यांची टीका   
19
विधानसभेपूर्वी तुतारी हाती घेणार?; चर्चेनंतर भाजप आमदार अश्विनी जगताप यांचं स्पष्टीकरण 
20
मोदींच्या पोस्टवर वीरेंद्र सेहवागची प्रतिक्रिया; पण काही वेळातच पोस्ट केली डिलीट, कारण...

Shivaji Maharaj Statue Collapse: दोषींना थेट फाशी द्या, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची ठाम भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 12:08 PM

राजकोट येथील पुतळा दुर्घटनेची पाहणी

मालवण : आज जगभरात समुद्रकिनारी अनेक मोठमोठे पुतळे साकारण्यात आले आहेत. आजपर्यंत कधीही किनारपट्टीवरील पुतळा कोसळण्याची दुर्घटना घडली नाही. मालवण राजकोट किल्ल्यातील शिवपुतळा बनविणाऱ्यांकडून मोठी चूक झाल्यानेच ही दुर्घटना घडली आहे. यामुळे अशा चुकीला माफी नसून यातील दोषींना थेट फाशीचीच शिक्षा द्यायला हवी, अशी ठाम भूमिका रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे मांडली.मंत्री आठवले यांनी रविवारी दुपारी राजकोट किल्ला येथे भेट देत दुर्घटनेची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले, राजकोट किल्ला येथे शिवस्मारक व्हावे. एक भव्य पुतळा उभारून किल्ल्याला पुनरुज्जीवित करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करावे ही राज्य शासनाची भावना चांगली होती. त्याप्रमाणे त्यांनी आवश्यक ते सहकार्य केले आहे. मात्र, पुतळ्याची निर्मिती चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याने ही दुर्घटना घडली. कोणत्याही प्रकारचे चक्रीवादळ न होता पुतळा कोसळला असल्याने त्याला राज्य शासनाला दोषी ठरविणे योग्य नाही. आता पुन्हा नव्याने पुतळा उभा करणे आणि शिवप्रेमींना पुन्हा आदराचे स्थान निर्माण करणे हे महत्त्वाचे आहे.शिवपुतळा दुर्घटना ही दुर्दैवीच घटना आहे. या घटनेवर राजकारण होऊ नये. या घटनेनंतर सर्वांनी एकत्रित होऊन घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. यातील दोषींचा शोध घेऊन त्यांना कडक शासन होण्यासाठी शासन यंत्रणांना सहकार्य करायला हवे. विरोधकांकडून फक्त टीका आणि राजकारण हीच भूमिका घेण्यात येत आहे. यातील प्रमुख आरोपीला फाशीची शिक्षा आणि इतर दोषींना कडक शासन व्हायला हवे.

समिती स्थापनेची सूचना

विरोधक आणि सत्ताधारी यांनी एकत्रित येत नवीन शिवपुतळा उभारण्यासाठी एक समिती स्थापन करून त्यानुसार कार्यवाही करणे महत्त्वाचे आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील चर्चा महत्त्वाची असते. याही ठिकाणी आवश्यकता भासल्यास आपण विरोधकांशी चर्चा करू आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून अशाप्रकारची समिती स्थापन करण्याच्या सूचना करू, असेही आठवले यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMalvan beachमालवण समुद्र किनाराrajkot-pcराजकोटShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजRamdas Athawaleरामदास आठवले