शहरं
Join us  
Trending Stories
1
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
2
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
3
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
4
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
5
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
6
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
7
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
8
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
9
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
10
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
11
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
12
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
13
Shubman Gill कमी पगारात मोठी जबाबदारी घ्यायला झालाय 'राजी'; जाणून घ्या त्यामागचं कारण
14
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
15
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
17
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
18
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
19
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
20
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!

सैनिक अकॅडमीच्या संचालकास अटक, देवगड समुद्रात विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 11:57 AM

देवगड (जि. सिंधुदुर्ग ) : देवगड समुद्रकिनाऱ्यावर विद्यार्थ्यांना सहलीकरिता नेऊन निष्काळजीपणे व हयगयीने मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी निगडी (पुणे) येथील ...

देवगड (जि. सिंधुदुर्ग) : देवगड समुद्रकिनाऱ्यावर विद्यार्थ्यांना सहलीकरिता नेऊन निष्काळजीपणे व हयगयीने मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी निगडी (पुणे) येथील खाजगी सैनिक अकॅडमीचे संचालक नितीन गंगाधर माने याला रविवारी देवगड पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता देवगड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन.बी. घाडगे यांनी रक्कम १५,०००रुपयांचा सशर्त जामीन मंजूर करत मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत.शनिवारी देवगड समुद्रकिनाऱ्यावर अंकिता गालटे, प्रेरणा डोंगरे, अनिशा पडवळ व पायल बनसोडे या चार मुलींचा समुद्रात बुडून मृत्यू झाला होता. या मुलींची जबाबदारी त्यांना सहलीसाठी घेऊन आलेल्या निगडी (पुणे) येथील खाजगी सैनिक क्लासचे संचालक नितीन गंगाधर माने यांच्यावर होती. मात्र, संबंधित संचालकांनी समुद्राच्या ठिकाणी नेले असताना त्यांना समुद्राच्या पाण्यात खेळत असताना कोणतेही लाइफ जॅकेट वा अन्य सुविधा पुरविलेल्या नाहीत.तसेच, किनाऱ्याच्या खोलीची कोणतीही माहिती, भरती ओहोटीची माहिती, स्थानिक जीवरक्षकांचा कोणताही सल्ला न घेता मुलांच्या काळजीसाठी कोणताही माहीतगार सोबत ठेवलेला नव्हता. तसेच, प्रशिक्षणार्थींना वाहनातून नेण्याकरिता जे वाहन वापरले त्याची चालक-मालकाकडून वाहतूक करावयाची कोणतीही परवानी प्रादेशिक परिवहन विभागाकडून घेतलेली नव्हती. विनापरवाना बस क्रमांक (एमएच१४ जीयूयू ९३८३)मधून त्यांचा चालक व मालक यांच्यासोबत संगनमत केले होते. अशा आशयाची तक्रार प्रेरणा राहुल गलाटे हिचे वडील राहुल पांडुरंग गलाटे (रा. उस्मानाबाद) यांनी देवगड पोलिसांत दाखल केली होती.

या तक्रारीनुसार आरोपी नितीन गंगाधर माने याने निष्काळजीपणे व बेपर्वाईने विद्यार्थिनींची योग्य काळजी न घेता सहल आयोजित केल्याप्रकरणी देवगड पोलीसांनी आरोपी नितीन गंगाधर माने यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. याकामी न्यायालयाने आरोपीला जामिनावर मुक्त केले आहे. संचालकासोबत सहलीसाठी वापरण्यात आलेली विनापरवाना बसचा मालक सखाराम बापू तांबे याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यालाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारी