संदेश कोलतेसावंतवाडी : यावर्षी सरासरीच्या तुलनेत झालेला मुसळधार पाऊस व तालुक्यात निर्माण झालेली पूर परिस्थिती त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या शेती व बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सरकारकडून नुकसानभरपाईची जरी घोषणा करण्यात आली असली तरी येथील शेतकऱ्यांच्या नुकसानीची व्याप्ती लक्षात घेता मिळणारी भरपाई ही तुटपुंजी असून विदर्भ व मराठवाड्याच्या धर्तीवर प्रत्येक झाडास वेगळे निकष लावून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ओटवणे दशक्रोशीतील शेतकरी करीत आहेत.सावंतवाडी तालुक्यात पुराचा सर्वाधिक फटका ओटवणे व बांदा परिसराला बसला. यात येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पुराच्या पाण्यामुळे येथील भातशेती, काजू, माड तसेच पोफळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरकारने नुकसानभरपाईची जरी घोषणा केली असली तरी शेतकऱ्यांच्या शेतात न जाता केवळ सातबाराच्या आधारे सरकार भरपाई देणार असल्याचे समजते.ओटवणे, बांदा भागात भातशेतीबरोबर काजू, माड पोफळी, केळीच्या बागा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे भात शेतीपासून मिळणारे उत्पन्न हे अल्प असले तरी भात शेतीच्या तुलनेत काजू तसेच माडापासून मिळणारे उत्पन्न जास्त आहे. तर काजू, माड, पोफळी या शेतीच्या लागवडीसाठी येणारा खर्च मोठा असून या शेतीपासून शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे उत्पन्न मिळते.तसेच् काजू शेतीचा उत्पादन खर्च व नफा भातशेतीच्या तुलनेत खूप जास्त आहे. त्यामुळे प्रत्येक शेतीपासून मिळणारे उत्पादन व उत्पन्न हे भिन्न असल्यामुळे सरकारने ठरविलेल्या सरसकट नुकसानभरपाईमुळे येथील शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.
सरकारने नुकसान भरपाई देताना अधिकाऱ्यांमार्फत नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून माड, पोफळी, केळी, काजू तसेच भातशेती यांना वेगवेगळे निकष लावून नुकसान झालेल्या प्रत्येक झाडांचा पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी येथील शेतकरी करीत आहेत.सरकार व लोकप्रतिनिधींनी जरी नुकसानभरपाईची घोषणा केली असली तरी मिळणारी भरपाई अल्प आहे. इथे केली जाणारी शेती ही वेगवेगळी असून एखाद्या काजू कलमांच्या पूर्ण वाढ करण्यासाठी पाच वर्षात येणारा खर्च हा दोन ते तीन हजारांच्या घरात आहे. हा खर्च भात शेतीच्या तुलनेत खूपच जास्त असून झालेल्या नुकसान भरपाईचे पंचनामे न करता जर सरकार सरसकट नुकसान भरपाई देत असेल तर येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. सरकारला द्यायचीच असेल तर प्रत्येक झाडास वेगवेगळे निकष लावून तसे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. भात शेतीच्या निकषावर येथील माड, काजू बागायतदारांना सरकार नुकसान भरपाई देत असेल तर ती सरकारने न दिलेली बरी.संदीप सावंतकाजू, बागायतदार शेतकरीमुसळधार पावसामुळे ओटवणे दशक्रोशीतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पूर परिस्थितीमुळे येथील केळी बागायतीचे नुकसान झाले आहे. (संदेश कोलते)2 अ३३ंूँेील्ल३२