मालवण : कोकणच्या विशेषत: सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या विकासासाठी रस्ते वाहतूक, विमान वाहतूक, रेल्वे वाहतूक आणि जलवाहतूक हे महत्वाचे मार्ग असून कोकणचा विकास या माध्यमातूनच सुलभरित्या होऊ शकतो. रत्नागिरी ते देवबाग सी प्लेनसाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली अशी माहिती रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी मालवण दौऱ्यात पत्रकारांशी बोलताना दिली. या पत्रकार परिषदेत खासदार राऊत यांनी राणे यांनी जो राज्यात राहून लोकांना लुबाडण्याचा आणि फसविण्याचा धंदा सुरु केला आहे तो बंद करावा असे टीकास्त्रही सोडले.खासदार विनायक राऊत यांनी नुकताच कट्टा, साळेल, हडी, कांदळगांव असा दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाप्रमुख वैभव नाईक, तालुकाप्रमुख बबन शिंदे, उपशहरप्रमुख किसन मांजरेकर, संजय गावडे, युवा सेना तालुकाप्रमुख मंदार गावडे, उपतालुकाप्रमुख हरी खोबरेकर आदी उपस्थित होते. राऊत म्हणाले, येत्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभेच्या जागा महायुती जिंकणार आहे. केंद्राच्या माध्यमातून कोकणच्या विकासासाठी जलवाहतुकीचे प्रस्ताव तयार करण्यात आले असून ते येत्या वर्षभरात कार्यान्वित होतील असा आशावादही खासदार राऊत यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
रत्नागिरी ते देवबाग सी प्लेनबाबत चचा
By admin | Published: August 29, 2014 10:44 PM