बांदा : भारत हा शेतीप्रधान देश असून ग्रामीण भागातील शेतीची उत्पादने सुधारीत शेती पद्धतीनुसार वाढविण्यावर भर देण्यात येणार असून यासाठी कोकणात जैविक शेती उत्पादकता प्रकल्प उभारण्यात येणार आहे. देशाला दिशा देण्याचे काम हे विचारवंत करतात, यासाठी या चर्चासत्राच्या माध्यमातून विचारमंथन घडावे, असे प्रतिपादन वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पानवळ येथे केले.येथील गोगटे- वाळके महाविद्यालयात आयोजित महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेच्या ३२ व्या वार्षिक अधिवेशन व राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी केसरकर बोलत होते. महाविद्यालयात ‘आंतरराष्ट्रीय संबंध- स्वरुप आणि आव्हाने’ या विषयावर तीन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रेसिडेंट उमेश फातरफोड यांनी भुषविले. यावेळी व्यासपीठावर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजन वेळुकर, औरंगाबादचे संमेलनाध्यक्ष डॉ. अशोक नाईकवाडे, प्रा. पी. डी. देवरे, डॉ. एस. पी. वेल्हाळ, प्राचार्य डॉ. श्रीकांत सावंत आदि मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.डॉ. अशोक नाईकवाडे म्हणाले की, ज्ञानदानाच्या क्षेत्रात प्रगती झाली आहे. भारताने व्यापारीकरण, खासगीकरण व जागतिकीकरण स्वीकारले आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाने किती संबंध प्रस्थापित केलेत याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. जागतिक राजकारणात आपल्या देशाची भूमिका काय राहणार याची सविस्तर चर्चा चर्चासत्रात होणे गरजेचे आहे. प्राचार्य डॉ. सावंत यांनी या चर्चासत्राचा उद्देश स्पष्ट केला.संस्थेचे अध्यक्ष उमेश फातरफोड म्हणाले की, मुंबई विद्यापीठाचा विस्तार हा मोठा असून विद्यापीठाच्या नियमावलीत ग्रामीण भागातील महाविद्यालयांना सवलत द्यावी अशी मागणी केली. यावेळी त्यांनी महाविद्यालयाची उभारणी व बांदावासीयांचे योगदान याबाबत माहिती दिली. हे केवळ चर्चासत्र नसून ज्ञानसत्र व विचारसत्र असून याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी या चर्चासत्रासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून विचारवंत, संशोधक उपस्थित होते. पहिल्या दिवशी तीन सत्रांमध्ये विविध विषयांवर वक्त्यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एन. डी. कार्वेकर यांनी केले. आभार प्रा. के. के. म्हेत्री यांनी मानले. (प्रतिनिधी)तंत्रज्ञानाचा फायदा घ्या : राजन वेळुकरसोशल मीडियाचा वापर हा अत्यावश्यक असून याचा अभ्यास करणे हा गरजेचा आहे. ज्ञानाच्या कक्षा रुंदावत चालल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध गोष्टींचे आकलन होते. यासाठी तंत्रज्ञानाचा फायदा घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कुलगुरु डॉ. राजन वेळुकर यांनी केले.
चर्चासत्रांमधून विचारमंथन घडाव
By admin | Published: January 15, 2015 10:11 PM