कणकवली : कणकवली तालुक्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर अज्ञाताकडून कणकवली येथे प्राणघातक हल्ला झाला. सदर हल्ला राजकीय वादातून झाला आहे असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचीनिवडणूक होईपर्यंत जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांना पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने कणकवली पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनात म्हटले आहे की, या हल्ल्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची नावे देण्यात आली आहेत. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हयातील शिवसेनेच्या नेते मंडळींबरोबर फिरत असलेले काही लोक हे हिस्ट्रीसीटर असून त्यांनीच हा हल्ला केला असण्याची दाट शक्यता आहे. त्याचे खापर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकत्यांवर फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.सद्या सिंधुदुर्ग जिल्हयात निवडणुकांचा प्रचार सुरू आहे. या निवडणूकांमध्ये जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठीच अशाप्रकारे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकत्यांची नावे गोवण्याचा प्रयत्न सुरू आहे. संतोष परब यांच्यावर झालेला हल्ला हा आर्थिक देवाणघेवाणीतूनच झाला असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.संतोष परब यांच्यावर ज्याठिकाणी हा हल्ला झाला तेथील सीसीटीव्हीचे फुटेज तपासून परब यांचे कॉल रेकॉर्डिंग तपासून आपण या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी यावेळी भाजपच्या शिष्टमंडळाने केली.यावेळी सभापती मनोज रावराणे, कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे, युवा मोर्चा सरचिटणीस संदीप मेस्त्री, नगरसेवक शिशीर परुळेकर, रवींद्र गायकवाड, मेघा गांगण, महिला प्रदेश सदस्य प्रज्ञा ढवण, प्रकाश सावंत, गणेश तळगावकर, संतोष पुजारे, सर्वेश दळवी, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन विठ्ठल देसाई, महिला शहराध्यक्ष प्राची कर्पे, प्रदीप ढवण, सदा चव्हाण, प्रशांत सावंत, संजना सदडेकर, नितीन पाडावे आदी उपस्थित होते
निवडणूक होईपर्यंत सतीश सावंतांना पोलीस संरक्षण द्या!, भाजपा शिष्टमंडळाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 4:15 PM