शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

जि. प., पं. स.’साठी आघाडी करणार

By admin | Published: October 17, 2016 12:09 AM

तानाजी कांबळे : जिल्ह्याची समन्वय समिती स्थापन

कणकवली : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना, भाजपपैकी कोणत्या तरी पक्षाशी आघाडी करण्याची आरपीआयची भूमिका असल्याची माहिती आरपीआयचे सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक तानाजी कांबळे यांनी येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत दिली. फुले, शाहू, आंबेडकर यांना मानणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांनी एकत्र येऊन समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती जिल्ह्यातील इतर पक्षांच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा करून आघाडीबाबत निर्णय घेणार आहे. या समन्वय समितीच्या अध्यक्षपदी भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष नाना डामरे यांची एकमताने निवड केली. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी येथील विश्रामगृहावर आरपीआय, भारिप बहुजन महासंघ व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणारे जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. समन्वय समितीच्या सरचिटणीसपदी जनीकुमार कांबळे, मिलिंद कांबळे, चंद्रकांत पवार, उपाध्यक्षपदी सुरेश साळीस्तेकर, संजय तांबे, रुपेश बावडेकर, प्रकाश खरात, ए. डी. साळुंखे, सहसचिवपदी उत्तम जाधव, बाजीराव जाधव, भारिप बहुजनचे नेते सतीशकुमार साळुंखे, रि.प.चे जिल्हाध्यक्ष आनंद तांबे, प्रकाश कडुळकर हे सामाजिक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. बसपा, चर्मकार, धनगर, तेली, तांबोळी, आदी समाजाला संघटित करून समन्वय समितीमध्ये सामील करून घेण्यात येणार आहे. या सर्व समाजाची एकजूट करण्यात येणार आहे. (वार्ताहर) मराठा मोर्चाला पाठिंबा ४२३ आॅक्टोबरला निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चाला आरपीआय, बहुजन समाज पार्टी, समन्वय समिती यांचा पाठिंबा असल्याची माहिती तानाजी कांबळे यांनी दिली. कोपर्डी प्रकरणाचा आरपीआयच्यावतीने त्यांनी निषेध केला. ज्यांनी मुलीवर अत्याचार केला त्या आरोपींना फाशी झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. ४अ‍ॅट्रॉसिटी रद्द करण्याला व दुरुस्तीला आरपीआयचा विरोध असल्याचे त्यांनी नमूद केले. आरपीआय, बसपा या मोर्चात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.