शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार

By admin | Published: June 18, 2014 12:35 AM

पावशी येथे रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाने सुरुवात केली असून आज, मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ८२.९५ च्या सरासरीने ६६३.६० मि.मी. पाऊस पडला असल्याची नोंद झाली आहे, तर येत्या ७२ तासांत जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. समुद्रात ताशी ४५ ते ५० कि.मी. वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे पावशी येथे रस्त्यावर झाड पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. जिल्ह्यात पावसाने जोर धरला असून, आतापर्यंत २९७.८०च्या सरासरीने २३८२.४० मि.मी. पाऊस पडला आहे, तर आज सकाळी ८ वाजेपर्यंत ८२.९५ च्या सरासरीने ६६३.६० मि.मी. पाऊस पडला आहे. यात दोडामार्ग ९९ (२७८) मि.मी., सावंतवाडी १२२ (३२२), वेंगुर्ला ८०.६० (२९१.४०), कुडाळ ७१ (३२२), मालवण ११८ (५१५), कणकवली ७४ (२०५), देवगड ३८ (२३०), वैभववाडी ६१ (२१९) मि.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. (प्रतिनिधी)