सिंधुदुर्गनगरी, दि. १७ : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या समर्थ विकास पॅनलने मुसंडी मारली आहे. शिवसेनेनेही काही जागा घेत जिल्ह्यात आपली ताकद अजूनही असल्याचे दाखवून दिले आहे. काँग्रेसला मात्र या जिल्ह्यात जागा मिळविण्यात अपयश आल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यातील आठही तालुक्यात मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात ९५ ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले. यात ४७ जागा समर्थ विकास पॅनेलकडे, २७ जागा शिवसेनेकडे, १२ जागा भाजपकडे, १ जागा युतीकडे तर ८ जागा गावपॅनलने पटकाविल्या आहेत.सावंतवाडी तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींवर विजय मिळविल्याचा भाजपाने 'दावा' केला असून माडखोल, कारिवडे, भोमवाडी, सरमळे, सातोळी-बावळाट,नेमळे, विलवडे, निगुडे, बांदा, गुळदुवे, कोनशी, दाभिळ, ओवळीये, असनिये, पडवे-माजगाव, पारपोली, शिरशिंगे आणि आजगाव ग्रामपंचायतींवर 'कमळ' फुलले आहे, अशी माहिती भाजपाचे तालुकाध्यक्ष महेश सारंग यांनी दिली आहे.सावंतवाडी तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींपैकी २४ ग्रामपंचायतींवर समर्थ विकास पॅनेलने विजय मिळविला आहे. भाजप पूरस्कृत पॅनेलने १३ ग्रामपंचायतींवर कमळ फुलविले असून शिवसेनेने ६ ग्रामपंचायतींवर भगवा फडकविला आहे. पक्ष विरहित गाव पॅनेलने ८ ग्रामपंचायतींवर विजय मिळविला असून राष्ट्रवादी काँग्रेसने फक्त एका कास ग्रामपंचायतींवर विजय मिळविला आहे.सावंतवाडी, मालवण, कणकवली आणि वैभववाडीत समर्थ विकास तर दोडामार्गमध्ये शिवसेनेने सर्वाधिक जागा मिळविल्या. देवगड, वेंगुर्ले येथील निकाल उशिरापर्यंत मिळाले नव्हते.वेंगुर्ले तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये वेतोरे येथे राधिका गावडे, वजराठ येथे महेश राणे, उभादांडा येथे देवेंद्र डिचोलकर, तुळस येथे शंकर घारे, शिरोडा येथे मनोज उगवेकर, रेडी येथे रामसिंग राणे, परबवाडा येथे विष्णु परब, परूळेबाजार येथे श्वेता चव्हाण, पालकरवाडी येथे संदीप चिचकर, म्हापण येथे अभय ठाकुर, मेढा येथे भारती धुरी, मठ येथे तुळशिदास ठाकुर, कोचरा येथे साची फणसेकर, होडावडा येथे अदिती नाईक, दाभोली येथे उदय गोवेकर, चिपी येथे गणेश तारी, भोगवे येथे रूपेश मुंडये, आसोली येथे रिया कुडव, अणसुर येथे अन्विता गावडे, आडेली येथे समिधा कुडाळकर, कुशेवाडा येथे स्नेहा राऊळ हे उमेदवार सरपंचपदासाठी विजयी झाले.माजगावमध्ये शिवसेनेचा ऐतिहासिक विजय झाला. येथे शिवसेना पुरस्कृत पॅनेलचे ११ उमेदवार विजयी झाले. समर्थ पॅनेलचे २ उमेदवार विजयी झाले. आते-भाच्याच्या लढाईत भाच्याने बाजी मारली. या निवडणूकीत जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांना धक्का बसला आहे. शिवसेनेचे सरपंचपदाचे उमेदवार दिनेश सावंत यांनी निसटता विजय मिळविला. समर्थ पॅनेलचे सरपंच पदाचे उमेदवार के. टी. धुरी पिछाडीवर गेले. या निवडणुकीत पोस्टल २० मते निर्णायक ठरली. या पोस्टल मतांमध्ये दिनेश सावंत यांनी आघाडी घेतली. अटीतटीच्या या लढतीत दिनेश सावंत यांनी अखेर बाजी मारली. समर्थ विकास पॅनेलचे सरपंचपदाचे के. टी. धुरी यांचा पराभव झाला. पोस्टल मतदानात दिनेश सावंत यांचा ५ मतांनी विजय होउन अखेर माजगावात भगवा फडकला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणेंंची जादू कायम, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 5:03 PM
सिंधुदुर्गनगरी, दि. १७ : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या समर्थ विकास पॅनलने मुसंडी मारली आहे. शिवसेनेनेही काही जागा घेत जिल्ह्यात आपली ताकद अजूनही असल्याचे दाखवून दिले आहे. काँग्रेसला मात्र या जिल्ह्यात जागा मिळविण्यात अपयश आल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यातील आठही तालुक्यात मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात ९५ ग्रामपंचायतीचे ...
ठळक मुद्दे काँग्रेसला अपयश, भाजपचे 'कमळ' फुललेशिवसेनेची मुसंडी सेना द्वीतीय भाजपा तृतीय स्थानी