शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करू

By admin | Published: April 08, 2017 9:38 PM

नूतन सभापतींची ग्वाही : जिल्हा परिषदेच्या सभापतींची निवड; नव्या चेहऱ्यांना संधी

सिंधुदुर्गनगरी : सर्वांच्या सहकार्यातूून जिल्हा परिषद सदस्य म्हणून पेंडूर जिल्हा परिषद मतदारसंघातून मी निवडून आलो. माजी मुख्यमंत्री नारायण राणे, जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, काँग्रेसच्या सर्वच सदस्यांनी माझ्यावर सभापतिपदाची टाकलेली जबाबदारी स्वीकारून जिल्ह्याच्या विकासासाठी काम करेन. जनतेच्या समस्या सोडवून सभापतिपदाचा पारदर्शक कारभार करणार असल्याचे मत वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.ते पुढे म्हणाले, वराड पंचायत समिती मतदारसंघातून पंचायत समिती सदस्य व त्यानंतर मालवण उपसभापतिपदावर मी यापूर्वी काम केले आहे. २०१० पासून राजकारणातून काँग्रेस पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले. आजही तसेच कार्य सुरू आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्ष मजबूत करण्यासाठी सभापतिपदाच्या माध्यमातून जिल्ह्याला पाठबळ देण्याचा प्रयत्न करत राहीन. सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचेही यावेळी संतोष साटविलकर यांनी सांगितले.यावेळी शारदा कांबळे म्हणाल्या, माझ्यावर जो विश्वास टाकला आहे. त्या समाजकल्याण सभापतिपदाचा उपयोग मी ग्रामीण भागातील दुर्लक्षित, मागासवर्गीय जनतेच्या विकासासाठी करणार आहे. तसेच जिल्ह्यात अनेक गावात अद्याप दुर्लक्षित विकास योजनांपासून वंचित मागासवर्गीय आहेत. समाजाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी अधिक भर देणार असल्याचे नूतन समाजकल्याण सभापती शारदा कांबळे यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, आपण कोळप मतदारसंघातून निवडून आलो आहोत. राजकारणात पहिलीच वेळ जरी असली तरी समाजकारणाची आवड आहे. माझे पती शरद कांबळे हे राजकारणात असल्यामुळे त्यांच्या अनुभवाचा तसेच पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सहकार्यातूनच व नव्या उमेदीने आपण समाजासाठी व अनेक उपक्रमातून मागासवर्गीय कुटुंबाना न्याय देण्याचा प्रयत्न करीत जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती म्हणून झालेली निवड सार्थ ठरवित, त्या पदाचा योग्य तो उपयोग समाजकल्याणासाठी करेन, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. नारायण राणे व कुटुंबीयांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्याचे सार्थक करून जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न कण्याची ग्वाही यावेळी शारदा कांबळे यांनी दिली. महिला व बालकल्याण सायली सावंत म्हणाल्या, राजकारणाचा माजी काँग्रेस अध्यक्ष रमाकांत सावंत यांचा वारसा आहे.माझ्यावर महिला व बालकल्याण समिती सभापतिपदाची जबाबदारी असून बचतगटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, कुपोषण मुक्तीचे काम, आरोग्यविषयी माहिती, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे, महिला शेतकरी यांना माहिती देणे तसेच अनेक योजनांची माहिती तळागाळार्पंत पोहोचविण्याचे काम करणार असल्याचे नूतन महिला व बालकल्याण सभापती सायली सावंत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)शैक्षणिक गुणवत्ता वाढविणार : राऊळ रेडी जिल्हा परिषद मतदारसंघात आरोग्यविषयक उपक्रमांबरोबरच रेडी जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व प्राथमिक शाळा डिजिटल करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण रेडी ग्रामपंचायत उपसरपंच पदापासून ते काँग्रेस युवक तालुकाअध्यक्ष तसेच सरचिटणीस पदापर्यंत कार्याची सुरूवात केली आहे. शिक्षण व आरोग्य ही दोन्ही खाती महत्त्वाची असून त्या खात्यांच्या योजनांचा मी जनतेपर्यंत पोहोचविण्याचा उपयोग केला आहे. अनेक समस्या व उपाययोजना राबविल्या आहेत. माकडताप, स्वाईन फ्ल्यू व इतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रयत्न करणार असून रेडी गावच्या सर्वच शाळा डिजिटल करून जिल्ह्यात नंबर एक राहण्याचा मान मिळविणार आहे. मार्गदर्शन विषयक करिअर गाईड्स तसेच इतर शिबिरे युवा वर्गासाठी राबविणार आहे. इंग्रजी सर्व ठिकाणी सुरू असून आता ही काळाची गरज असल्याने प्राथमिक शाळांना लक्ष केंद्रीत करून उपक्रम राबविणार आहे, असे मत शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी व्यक्त केले.