सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकविल्यानंतर प्रथमच सावंतवाडीत आलेले माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवनियुक्त नगराध्यक्ष संजू परब यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारत ह्यचांगले काम करा, आम्ही सोबत आहोतह्ण असे सांगितले. यावेळी नगराध्यक्ष परब यांनी फडणवीस यांच्याकडे नगरपालिकेला निधी मिळावा यासाठी निवेदन सादर केले. त्यावर निधी देण्याचे फडणवीस यांनी मान्य केले.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी सिंधुदुर्गमध्ये आले होते. ते सोमवारी गोवामार्गे मुंबईला जात होते. मात्र, सावंतवाडीचे नगराध्यक्ष संंजू परब यांंनी आग्रह केल्यानंतर ते काही मिनिटांसाठी सावंतवाडीत आले होते. त्यांचे नगराध्यक्ष संजू परब यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी भाजप नेते रवींद्र चव्हाण, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाई गिरकर, जिल्हाध्यक्ष राजन तेली, आमदार निरंजन डावखरे, प्रसाद लाड, नीतेश राणे उपस्थित होते.यावेळी सभापती मानसी धुुरी, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, उदय नाईक, मनोज नाईक, आनंद नेवगी, अॅड. परिमल नाईक, पुखराज पुरोेहित, मंडल अध्यक्ष संदीप गावडे, महेश धुरी, अजय गोंदावले, विनोद सावंत, श्रीपाद चोडणकर, अजय सावंत, केतन आजगावकर, गुरू मठकर, अमित परब, हेमंत बांदेकर, बेला पिंटो, परिणिती वर्तक, दीप्ती माटेकर, धनश्री गावकर, आदींनी फडणवीस यांचे स्वागत केले. त्यानंतर ते गोव्याकडे रवाना झाले.यावेळी पोलीस उपअधीक्षक शिवाजी मुळीक यांंच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्तही सावंतवाडीत तैनात केला होता. यावेळी नगराध्यक्ष परब यांनी विकासकामांबाबत निवेदने दिली. त्यावर निश्चित विचार करू असे त्यांनी सांगितले.सावंतवाडी पालिकेवर प्रथमच भाजपचा झेंडासावंतवाडी नगरपालिकेवर प्रथमच भाजपचा झेंडा फडकविण्यात यश आले आहे. निवडणूक होऊन सात महिने पूर्ण झाले आहेत. या काळात प्रथमच सावंतवाडीला भाजपचे राज्यातील सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. सुरुवातीला त्यांनी सावंतवाडी नगरपालिकेला भेट देणार असे जाहीर केले होते.
नंतर मालवण येथे प्रवेशाचा कार्यक्रम असल्याने वेळ झाल्याने अखेर सावंतवाडी शहराला धावती भेट देण्याचे त्यांनी मान्य केले. नगराध्यक्ष संंजू परब यांनी खास आग्रह करीत फडणवीस यांनी सावंतवाडीला तरी भेट द्यावी अशी विनंती केली होती. त्यानुसार ते सावंतवाडी शहरात आले होते.