शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

डॉक्टरांनी अहवाल ठेवला राखून!

By admin | Published: February 03, 2015 11:35 PM

शेतकरी खूनप्रकरण : पोलिसांच्या तपासातील प्रगतीला ‘ब्रेक’

खेड : खेड तालुक्यातील सुसेरी नं.२ या गावातील शेतकरी संतोष बाळकृष्ण केसरकर (५०) यांच्या सोमवारी आढळलेल्या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल अद्याप जाहीर करण्यात आला नाही. खेड नगरपरिषदेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख यांनी हा अहवाल तयार केला असून, सायंकाळी उशिरापर्यंत तो पोलिसांना प्राप्त न झाल्याने, केसरकर यांच्या मृत्युचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात राहिले आहे.दरम्यान केसरकर यांच्या गळ्यावर मारहाण केल्याच्या कोणत्याही खुणा नसल्याचे, तसेच त्यांच्या पोटात अन्न नसल्याचे निष्पन्न झाल्याचे, डॉक्टरांनी सांगितल्याने केसरकर यांचा खून झाल्याच्या शक्यतेबाबत साशंकता निर्माण झाली आहे.याबाबतचा अहवाल राखून ठेवण्यात आल्याने पोलिसांचीही पंचाईत झाली आहे. दरम्यान, केसरकर यांचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.सुसेरी नं.२ या गावातील संतोष केसरकर हे सोमवारी शेळ्या चारण्यासाठी घेऊन लगतच्या जंगलात गेले होेते़ सकाळी गेलेले केसरकर, सायंकाळी उशिरापर्यंत परत न आल्याने त्यांची पत्नी त्यांचा शोध घेत असताना, गावातीलच खेमनाथ मंदिरानजीक असलेल्या रहाटीमध्ये त्यांचे शव आढळून आले होते़ त्यांनी ग्रामस्थांमार्फत पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाल केली. त्यांचे शव ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्या गळ्यावर काही खुणा होत्या़ तसेच त्यांच्या गळयात सोन्याची चेन आणि हाताच्या बोटामध्ये असलेल्या दोन अंगठ्या गायब होत्या. त्यामुळे, सोन्याच्या दागिन्यांपायी कोणीतरी खून केल्याचा संशय पोलिसांनीही वर्तवला होता़ मात्र, मंगळवारी दुपारी २.३० वाजता खेड नगरपरिषदेच्या दवाखान्यात शवविच्छेदन करण्यात आले. हा अहवाल अद्याप पोलिसांना प्राप्त न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे, तर केसरकर यांच्या पोटात काहीही अन्न नसल्याने त्यांचा मृत्यु झाला असावा, असेही सांगण्यात येत आहे.दरम्यान, केसरकर यांच्या शवाचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तसेच, अहवाल प्राप्त झाल्यानंतरच केसरकर यांचा खून झाला अथवा नाही, किंवा खून झाला असेल तर कोणत्या कारणाने झाला, हे समजणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.बेताची आर्थिक परिस्थिती असलेले हे कुटुंब केसरकर यांच्या निधनामुळे पोरके झाले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास खेडचे पोलीस करत आहेत. (प्रतिनिधी)