देवगड : वीज ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आमदार नीतेश राणे यांनी देवगड शासकीय विश्रामगृहामध्ये वीज अधिकाऱ्यांसमोर घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये अनेक ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले असून, गणेश चतुर्थीमध्ये विद्युतपुरवठा खंडित होता कामा नये, असा आदेशही आमदार नीतेश राणे यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. देवगड शासकीय विश्रामगृहामध्ये तालुक्यातील विजेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आमदार नीतेश राणे यांनी वीज अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता एस. वाय. सोरटे, उपकार्यकारी अभियंता देवगडचे पालशेतकर, देवगड सभापती डॉ. मनोज सारंग, उपसभापती स्मिता राणे, तालुकाअध्यक्ष प्रकाश राणे, जिल्हा परिषद सदस्य भगवान फाटक, पंचायत समिती सदस्य प्रणाली माने, नम्रता शिर्सेकर, दिप्ती घाडी, नंदकुमार देसाई, सुभाष कोकाटे, अनघा राणे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाळा खडपे, बापू धुरी, उल्हास मणचेकर, मिलिंद माने, योगेश चांदोस्कर, रवी पाळेकर व तालुक्यातील विजेचे प्रश्न निवेदनाद्वारे घेऊन आलेले ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)प्रश्नांच्या निराकरणाचा प्रयत्नगेले काही दिवस महावितरणाच्या समस्या वाढल्या असून, अचानक भारनियमन सुरू होणे, विद्युत तारा तुटणे, विद्युत शेतीपंप न मिळणे, जीर्ण विद्युत खांब बदलणे, घरावरून गेलेल्या विद्युत तारा बदलणे, घरगुती विजेच्या समस्या, रस्त्यावरील दिवाबत्तीच्या समस्या, अशा अनेक समस्या वीज ग्राहकांनी निवेदनाद्वारे विद्युत अधिकाऱ्यांना दिल्या व या समस्यांवर आमदार नीतेश राणे यांच्यासमोर चर्चा करून तत्काळ सोडविण्यात येणार असल्याचे विद्युत अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे अनेक विद्युत ग्राहकांच्या प्रश्नांचे तूर्तास तरी निराकरण झाल्याचे दिसत होते.विजेचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासनयेत्या पंधरा दिवसांत विद्युत समस्या मार्गी लावण्यात येणार असल्याचे वीज वितरण अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी विजेच्या समस्या घेऊन आलेल्या ग्रामस्थांनी आमदार नीतेश राणे यांचे आभार मानले. तन्वी चांदोस्कर, मिलिंद माने, अजित राणे, प्रवीण राणे, अजित घाडी, मकरंद जोशी यांनी नाडण गावच्या विजेच्या समस्या मांडल्या. तर नरेश डांबरे यांनी मिठमुंबरी गावामध्ये दिवाबत्ती बंद असल्याचे निवेदन देऊन चर्चा केली. तर प्रकाश राणे यांनी सौंदाळे-हेळदेवाडी येथील नवीन वसाहतीमध्ये विद्युतपुरवठा नसल्याचे वीज वितरण अधिकाऱ्यांसमोर प्रश्न उपस्थित केला.
गणेश चतुर्थीत वीज पुरवठा खंडित करू नका
By admin | Published: August 11, 2015 10:48 PM