शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

अखंडित वीज पुरवठा करू

By admin | Published: June 19, 2016 12:45 AM

प्रभाकर निर्मळे : वीज अधिकारी, कर्मचाऱ्यांची अभियंत्यांकडून कानउघडणी, वेंगुर्लेतील समस्यांबाबत बैठक

वेंगुर्ले : कुडाळ-वेंगुर्ले-मळेवाड या ३३ केव्हीच्या लाईनमधील बिघाड तसेच सतत वीजप्रवाह खंडीत होत असलेले कारण दूर करण्यासाठी येत्या पंचवीस दिवसात वेंगुर्ले तालुक्याला अखंडीत वीजप्रवाह देणार असल्याचे आश्वासन देत वेंगुर्ले तालुक्यातील व शहरातील वीज अधिकारी-कर्मचाऱ्यांचा महावितरण कंपनीचे सिंधुदुर्ग अधीक्षक अभियंता प्रभाकर निर्मळे यांनी कामातील दिरंगाईबाबत चांगलीच कानउघडणी केली. वेंगुर्ले शिवसेनेच्यावतीने शहरात व तालुक्यात सततचा खंडीत होणारा वीजप्रवाह व अन्य प्रश्नाबाबत वेंगुर्ले महावितरण कार्यालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीस महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रभाकर निर्मळे, कुडाळ परिक्षेत्र कनिष्ठ अभियंता ए. पी. चौगुले, कणकवली कार्यकारी अभियंता प्रदीप सोरते, वेंगुर्ले वीज मंडळाचे कनिष्ठ अभियंता एच. डी. जोशी, शहर अभियंता ए. डी. मठकर, ग्रामीण अभियंता ए. जी. चव्हाण, पी. एस. चौगुले तसेच वेंगुर्ले शिवसेना तालुकाप्रमुख सुरेश नाईक, शहरप्रमुख विवेक आरोलकर, दक्षता समितीचे अध्यक्ष सचिन वालावलकर, सुरेश भोसले, रजत साळगांवकर, पंकज शिरसाट, डीलीन डिसोजा, वालावलकर, आनंद बटा आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. कुडाळ-वेंगुर्ले, इन्सुली-मळेवाड-वेंगुर्ले, इन्सुली-मळेवाड अशा तीन ठिकाणावरुन वीजपुरवठा दिला जातो. परंतु केवळ कुडाळ-वेंगुर्ले, इन्सुली-मळेवाड-वेंगुर्ले या दोनच भागातून तालुक्याला वीज दिली जाते. परंतु इन्सुली-मळेवाड येथून पर्यायी वीज सेवा दिल्यास शहर व तालुक्याचा वीजप्रवाह खंडीत होण्याची समस्या पूर्णत: दूर होऊ शकते. या सर्व लाईनला अडथळा ठरणाऱ्या भागातील झाडी तातडीने साफ करणे व गंजलेले वीज खांब बदलणे आणि ज्या ठिकाणी वीज खांबावरील नादुरुस्त साहित्य तातडीने बदलण्याबाबत सुचना अधीक्षक अभियंता यांनी दिल्या. या संदर्भात तातडीने टेंडर प्रोसेस करण्यात यावी याबाबत आदेश दिले. (वार्ताहर)