शहरं
Join us  
Trending Stories
1
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
2
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
3
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
5
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
6
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
8
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
9
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
10
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
11
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
12
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
13
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
14
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
15
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
16
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
18
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
19
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
20
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल

‘तुमचो कचरो आमच्या खळ्यात कित्याक’?

By admin | Published: April 24, 2017 9:49 PM

कचरा शब्द सर्वत्र बनतोय कळीचा मुद्दा : कारिवडेतील कचरा प्रकल्प वाद ४१ वर्षांनंतर उभा; मार्ग काढण्याचा प्रयत्न

अनंत जाधव -- सावंतवाडी --‘तुमचो कचरो आमच्या खळ्यात कित्याक’ ही मालवणी म्हण सध्या कारिवडे कचरा प्रकल्प वादावर तंतोतंत लागू होत आहे. सावंतवाडीचा कचरा पालिका १९७६ साली कारिवडे येथे विकत घेतलेल्या जमिनीवर टाकणार आहे; पण तो कचरा आमच्या अंगणात नको म्हणून हा वाद ४१ वर्षांनंतर उभा राहिला आहे. धुमसत असलेला प्रश्न अचानक रस्त्यावर आल्याने आता यावर मार्ग कसा काढायचा, हाच प्रश्न सध्या सगळ्यांना भेडसावत आहे. पालिका म्हणते आम्ही खत प्रकल्प उभारत आहे. तर कारिवडे ग्रामस्थ खत प्रकल्प नसून कचरा प्रकल्पच असल्याचे सांगत विरोध करीत आहेत. त्यामुळे ‘कचरा’ हा शब्द सध्या कळीचा मुद्दा बनल्याचे चित्र कारिवडेच्या निमित्ताने पुन्हा दिसू लागले आहे.सावंतवाडी शहर भविष्यात वाढणार आणि कचरा प्रश्नही एक मोठी समस्या बनणार म्हणून १९७६ साली तत्कालीन पालिकेतील काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांनी कारिवडे येथे पाच एकर जागा घेतली होती. ज्यावेळी जागा घेतली त्यावेळी या जागेच्या आजूबाजूला तशी दाट लोकवस्ती नव्हती. मात्र, नंतर नंतर या परिसरात लोकवस्ती वाढू लागली होती. अनेकांनी या प्रकल्पाची जमीन असलेल्या आजूबाजूला घरेही बांधली आहेत. तेथे ग्रामस्थ राहण्यासाठीही आले आहेत.१९७६ साली पालिकेने जमीन खरेदी केली, तर या जमिनीवर २००२ साली कागदोपत्री प्रकिया करण्यास सुरुवात केली. या जमिनीवर पालिकेने कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यासाठी ८ मे २००२ ला कारिवडे ग्रामपंचायतीकडे ना हरकत दाखल्याची मागणी केली; पण तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाने ही परवानगी नाकारली. या विरोधात पालिका जिल्हा परिषद स्थायी समितीकडे गेली. त्यांनीही ६ जुलै २००२ ला परवानगी नाकारली. त्यामुळे पालिकेने या निर्णयाविरोधात विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली होती. त्यांनी पालिकेला अटी व शर्ती घालून प्रकल्पाला ७ जुलै २०११ ला परवानगी दिली होती.पण, याच काळात उच्च न्यायालयात कचरा प्रकल्पाविरोधात एक याचिका दाखल झाली होती. त्यावर निर्णय देताना शासनाला घनकचरा व्यवस्थापनाबाबत काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. त्या सर्व नियमांना धरून तत्कालीन जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायत यांची संयुक्त बैठक घेऊन कचरा प्रकल्पाबाबत कठोर निर्देश दिले व त्यांची अंमलबजावणी करण्यास सांगितले होते.त्यानुसार पालिकेने दिल्ली येथील आयआरजी कंपनीकडून प्रकल्प अहवाल तयार करून घेतला. तसेच पर्यावरण व प्रदूषण विभागानेही जागेची पाहणी केली व अटी-शर्तीे घालून प्रकल्प करण्याबाबत संमती दिली. त्यासाठी पालिकेने १९ आॅक्टोबर २०१६ ला प्रकल्पस्थळी कंपाऊंड वॉल बांधण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून तहसीलदारांकडे अर्ज केला होता. त्याला गटबुक नकाशाप्रमाणे परवानगी दिली. मात्र, पालिका काम सुरू करण्यापूर्वी हा कचरा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.कचरा हा प्रश्नच सर्वत्र कळीचा मुद्दा बनत चालला आहे. नगरपालिकेने खत निर्मिती प्रकल्प उभारत असल्याचा कितीही दावा केला तरी पालिकेच्या जुन्या डंपिंग ग्राऊंडची आजची स्थिती पाहता आपल्या शेजारी असा प्रकल्प कोण हवा म्हणणार, हा प्रश्नच आहे. पालिका या ठिकाणी आठ फूट उंच कंपाऊंड वॉल उभारणार आहे; पण या कंपाऊंड वॉलबाहेर जाणाऱ्या दुर्गंधीला कसे रोखणार? आज पालिकेच्या दाव्याप्रमाणे अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले आहे; पण त्याचा वापर कसा करणार? ‘क’ वर्गात असलेली पालिका मनुष्यबळ कोठून आणणार? हाही प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे.सावंतवाडीत साधारणत: आठ टन कचरा तयार होतो; पण यातील सर्वच कचरा पालिका या प्रकल्पावर नेणार नाही. पालिकेने एक पाऊल पुढे जात मच्छिमार्केटच्या कचऱ्याची तिथल्या तिथे विल्हेवाट लावण्याचे ठरविले आहे. तीन प्रभागांत कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्यात आले होते. त्यातील एक प्रकल्प बंद आहे. मात्र, असे प्रकल्प उभारणे पालिकेला शक्य नाही. कारण प्रभागनिहाय प्रकल्प झाल्यास कर्मचाऱ्यांची संख्या वाढेल आणि ते पालिकेला न परवडणारे आहे. (क्रमश:)कचरा की खत प्रकल्प?सावंतवाडी नगरपालिकेने ४१ वर्षांपूर्वी कारिवडे येथे कचरा प्रकल्पासाठी पाच एकर जमिनीचे भूसंपादन केले. मात्र, आज या प्रकल्पाला होणाऱ्या विरोधामुळे पालिकेचा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्यातच पालिका म्हणते हा खत प्रकल्प, तर कारिवडेवासीय म्हणतात कचरा प्रकल्प. त्यामुळे खरे कोण आणि खोटे कोण, याचा आढावा ‘कचरा प्रकल्प की खत प्रकल्प’ या मालिकेतून घेण्यात आला आहे.कारिवडेतील प्रकल्पासाठी दोन्हींकडून समन्वय हवाकारिवडेत कचरा प्रकल्प उभारण्यासाठी पालिकेने ४१ वर्षांनंतर पुढाकार घेतला आहे; पण हा प्रकल्प उभारण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.पण, कारिवडेतील प्रकल्प उभारायचा असेल तर पालिकेने ग्रामस्थांशी समन्वय वाढविणे गरजेचे आहे. आपल्या प्रकल्पाचा त्रास ग्रामस्थांना कसा होणार नाही हे त्यांना पटवून देणे गरजेचे आहे.पालिकेने हा प्रकल्प जर विरोध डावलून केला, तर धुमसत असलेला वाद आणखीनच वाढणार. त्यामुळे समन्वय ठेवणे तेवढेच गरजेचे आहे.