शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
2
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
3
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
4
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
5
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
6
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
7
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
8
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
9
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
10
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
11
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
13
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
14
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
15
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
16
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
17
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
18
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
19
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त

दोडामार्गातील युवकांनी जपली मैत्री

By admin | Published: September 06, 2015 8:51 PM

दिल दोस्ती दुनियादारी..! : पिकुळेतील लक्ष्मण गवसला आधार

वैभव साळकर --दोडामार्ग --संकटकाळी मदत करतो तो खरा मित्र, आपली चूक लक्षात आणून देतो तो मित्र अशा मैत्रीच्या व्याख्या केल्या जातात वर्षभरापूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘दुनियादारी’ या मराठी चित्रपटाने मैत्री कशी असावी, त्याचे उदाहरण सर्वांना दिले. असेच मैत्रीचे नाते जोपासले आहे दोडामार्गमधील मित्रांनी. पिकुळे-मधलीवाडी येथील लक्ष्मण सोमा गवस यांचे सहा महिन्यात तीन बैल मृत झाले. त्यांच्यातील दोन तर अगदी पावसाच्या तोंडावर. मग शेती करायची कशी? असा प्रश्न गवस कुटुंबियांवर पडला. आपल्या मित्राला आधार दिला पाहिजे, यासाठी त्याच्या दोडामार्गातील मित्रांनी ३० हजार रूपयांची मदत केली आणि मित्रत्वाचे नाते दृढ केले.गवस हे कुटुंबप्रमुख. त्यांच्या कुटुंबात आईसह पत्नी व तीन मुलगे राहतात. एक मुलगा महाविद्यालय, तर दोन विद्यालयीन शिक्षण घेतात. गवस यांचा चरितार्थ केवळ शेती व्यवसायावर चालतो. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर वर्षाची आर्थिक समीकरणे ठरतात. खासकरून पावसाळी शेतीतील भात हे उपजीविकेचे महत्त्वाचे साधन आहे. आपल्या कुटुंबाच्या कष्टाच्या जीवावर गवस हे शेती करतात. यासाठी त्यांचे तीन बैल होते. आहे त्याच्यात समाधान मानणारे हे कुटुंब आपल्या गरजा भागवित सुखी होते. पण अचानक दृष्ट लागावी तशी एकेक प्रकरणे धक्काच देणारी ठरली. सुरूवातीला एक बैल अचानक मृत पावला. काहीतरी इजा झाली असेल, उर्वरीत दोन बैलांनी शेती करूया, असे त्यांनी ठरविले आणि आठवडाभरापूर्वी उर्वरीत दोन बैलही दगावले. या प्रकाराने गवस कुटुंबाला अक्षरक्ष: धक्का बसला. आता करायचे काय? असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला.तीनही बैैलांचे पंचनामे करण्यात आले. मात्र, अद्यापपर्यंत नुकसान भरपाई काहीही मिळाली नाही. कुटुंबप्रमुख गवस या प्रकाराने खचले. त्यांनी आपल्या मुलांप्रमाणे वाढवलेले बैल दगावले. हे घरातील कुटुंबाच्या सदस्यांच्या बाबतीत झाल्यासारखे होते. सारे कुटुंब दु:खात बुडाले. ही बातमी त्यांच्या दोडामार्गातील मित्रांना समजली. मित्रासाठी काहीतरी केले पाहिजे, त्याला सावरले पाहिजे, या विचाराने प्रशांत नाईक, (उगाडे), गिरीष कळणेकर (कळणे), अ‍ॅड. दाजी नाईक (उसप), अजित गवस (उगाडे), अशोक लोंढे (कोनाळकट्टा), किरण तळावडेकर (मणेरी), गुंडु केसरकर (घोटगे), सुधीर नाईक (मणेरी), संजय केसरकर (कोनाळकट्टा), संदीप गवस (दोडामार्ग), संतोष देसाई (कुडासे) यांनी एकत्र येत ३० हजार रूपये जमा करीत गवस यांच्याकडे सुपूर्द केले.याला म्हणतात मैत्री!दरवर्षी फ्रेंडशिप डे साजरा होतो. यावेळी कोण मित्राला गुलाब देतो, तर कोणी मॅसेज पाठवितो. मोबाईलचे इनबॉक्स तर फुल्ल झालेले असतात. सोशल मीडियात तर हा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो. परंतु संकटात सापडलेल्या मित्राला मदत करण्याच्या घटना, मैत्रीचा आधार देवून उभारी देण्याच्या घटना क्वचितच घडतात आणि त्याची दखलही अपवादानेच घेतली जाते. मात्र, मैत्रीच्या नात्याचा दिवा अखंड तेवत ठेवण्याचे काम केले आहे दोडामार्गमधील मित्रांनी. त्यांनी आपल्या मित्राला केलेली मदत ही बराच बोध देणारी आहे. अशा मित्रांना मनापासूून 'सॅल्युट'!