दोडामार्ग : निवडणुका कधीही होऊ द्या, दोडामार्ग तालुक्यावर अन्याय करणारा शिवसेनेचा आमदार पुन्हा निवडून येणार नाही, यासाठी एकसंघ होऊन काम करा. त्याकरिता निर्णय आणि निर्धाराला निष्ठेची जोड द्या, असे आवाहन खासदार नारायण राणे यांनी केले. राज्यात सत्ता कोणाचीही असली तरी कोकणातील कामे न झाल्यास आम्ही सत्ताधाऱ्यांना स्वस्थ बसू देणार नाही, असा इशाराही त्यांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला दिला.दोडामार्ग तालुका भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली, जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र्र म्हापसेकर, डॉ. अनिषा दळवी, प्रभाकर सावंत, अशोक सावंत, एकनाथ नाडकर्णी, गुरुनाथ पेडणेकर, तालुकाध्यक्ष संतोष नानचे, सुधीर दळवी आदी उपस्थित होते.खासदार राणे यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेवर सडकून टीका केली. सेना सत्तेसाठी लाचार झाली. बाळासाहेबांनी कधी दिल्लीत जाऊन मान झुकवली नाही. परंतु उद्धव ठाकरेंनी आपल्या सत्तेसाठी भाजपशी गद्दारी करून लाचारी पत्करली. एवढेच नव्हे तर ती सत्ता टिकावी यासाठी संसदेत नागरिकत्व विधेयकावेळी हिंदू धर्मालाही धोका दिला, असा घणाघाती आरोप केला.दोडामार्ग तालुक्यात बेकारी व आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी इथल्या जनतेला गोव्यावर अवलंबून रहावे लागत आहे. ही शोकांतिका आहे. मी उद्योगमंत्री असताना बेकारी दूर करण्याच्या उद्देशाने आडाळीत एमआयडीसी आणली. मात्र, त्यानंतर सत्ता जाऊन येथे सेनेचे आमदार निवडून आले. उद्योगमंत्रीही सेनेचेच होते, तरीसुद्धा एमआयडीसी सुरू होऊ शकली नाही. आरोग्याच्या बाबतीतही तीच अवस्था आहे. मात्र, खासदार म्हणून मी आणि आमदार नीतेश राणे इथली व्यवस्था सुधारण्याची जबाबदारी घेत आहोत. त्यासाठी कोणतीही कमी पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही दिली.उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी नितीमत्ता सोडलीहिंदुत्वाचा सेनेला विसर पडला आहे. माझ्या धर्मापेक्षा पद मोठे नाही, असे बाळासाहेब नेहमी सांगायचे. मात्र, पैशांसाठी सत्ता आणि सत्तेसाठी पैसा हा एककलमी कार्यक्रम राबविण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांशी हातमिळवणी करून उद्धव ठाकरेंनी नीतिमत्ता सोडली, अशी टीका यावेळी राणे यांनी केली. शेतकºयांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा करणाºया उद्धव ठाकरेंनी राज्याची तिजोरी तरी पाहिली आहे काय? असा टोलाही राणेंनी लगावला. यावेळी त्यांनी पक्षवाढीसंदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
सत्ताधाऱ्यांना स्वस्थ बसू देणार नाही : नारायण राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 5:28 PM
निवडणुका कधीही होऊ द्या, दोडामार्ग तालुक्यावर अन्याय करणारा शिवसेनेचा आमदार पुन्हा निवडून येणार नाही, यासाठी एकसंघ होऊन काम करा. त्याकरिता निर्णय आणि निर्धाराला निष्ठेची जोड द्या, असे आवाहन खासदार नारायण राणे यांनी केले. राज्यात सत्ता कोणाचीही असली तरी कोकणातील कामे न झाल्यास आम्ही सत्ताधाऱ्यांना स्वस्थ बसू देणार नाही, असा इशाराही त्यांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला दिला.
ठळक मुद्देसत्ताधाऱ्यांना स्वस्थ बसू देणार नाही : नारायण राणे दोडामार्ग येथे कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेनेवर केली चौफेर टीका