शहरं
Join us  
Trending Stories
1
हे एका रात्री मिळवलेलं यश नाही! ऐतिहासिक विजयानंतर रोहित शर्माचे भावनिक स्पीच 
2
हा माझा शेवटचा वर्ल्ड कप! विराट कोहलीची मोठी घोषणा; रोहित शर्माबाबत मन जिंकणारे विधान 
3
India won World Cup : १७ वर्षानंतर आनंदोत्सव! रोहित शर्मा अन् भारताची वर्ल्ड कप विजयाची स्वप्नपूर्ती
4
रोहित शर्मा रडला, विराट अन् हार्दिकही रडला; बघा सूर्याच्या अफलातून कॅचने सामना फिरवला 
5
पुण्याची तुलना पंजाबशी नको, शहराचे नाव खराब होईल असे बोलू नका; मुरलीधर मोहोळांची विनंती
6
नजर हटी, दुर्घटना घटी! Axar Patel ने हलक्यात घेतले, क्विंटन डी कॉकने त्याला माघारी पाठवले
7
“सरकारलाच तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ आली आहे”; तीर्थदर्शन योजनेवर नाना पटोलेंची टीका
8
"आमचं ऐकलं नाही तर विधानसभा निवडणुकीत पराभूत करू’’, या राज्यात सरपंचांनी वाढवलं भाजपा सरकारचं टेन्शन
9
लेक लाडकी योजनेचे काय झाले? तुम्ही केलेले काम लोक विसरले वाटतेय का; वर्षा गायकवाडांचा शिंदेंना टोला
10
“राहुल गांधींना पंतप्रधानपदाचा चेहरा केले असते तर २५ ते ३० जागा वाढल्या असत्या”: संजय राऊत
11
संत ज्ञानेश्वर महाराजांचा प्रस्थान सोहळा संपन्न; उद्या सकाळी आजोळघरातून होणार प्रस्थान
12
“मनोज जरांगे हे तर राजकारणाचे आयकॉन, १० दिवसांत...”; अब्दुल सत्तार यांचे मोठे विधान
13
“काँग्रेसला जमत नाही म्हणून भाजपा-शिंदे गट सत्तेत आहे”; बच्चू कडूंचा खोचक टोला
14
माझं मन सांगतंय दक्षिण आफ्रिका जिंकायला हवी, पण...! Shoaib Akhtar चं फायनलपूर्वी मोठं भाकित
15
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर; माता भगिनींनी CM एकनाथ शिंदेंना बांधल्या राख्या
16
कर्नाटक काँग्रेसमध्ये कलह! मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांमध्ये वाद?; डीके शिवकुमार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या 'या' सूचना
17
"अतिरिक्त अर्थसंकल्पाला मान्यता नसताना जीआर काढणे हा हक्कभंग’’, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप 
18
“लोकसभेत १५५ विधानसभा मतदारसंघात भाजपा पराभूत, इथे सत्ता बदलणारच...”: शरद पवार
19
भाजपातून जदयूत आले, नितीशकुमारांनी पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष केले; उत्तराधिकारी की...?
20
बाईकची चाचणी देऊन मिळवलं क्रेन चालवण्याचे लायसन्स; अंधेरी RTO च्या भ्रष्टाचावरुन वडेट्टीवारांचे ताशेरे

नारायण राणेंना संसदेत बाके वाजवायला बसवलं का,  डॉ.जयेंद्र परूळेकर यांचा सवाल 

By अनंत खं.जाधव | Published: June 20, 2024 5:02 PM

मल्टीस्पेशालिटीची स्वप्न बघण्यापेक्षा रूग्णालये सुधारा

सावंतवाडी : खासदार नारायण राणे यांच्याकडून मंत्रीपद काढून घेऊन मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे भाजपच्या वरिष्ठांनी त्यांना फक्त बाक वाजवण्यासाठी सभागृहात बसवल का? असा सवाल ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परूळेकर केला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.दरम्यान सावंतवाडी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे गाजर लोकांना दाखवण्यापेक्षा मंत्री दीपक केसरकरांनी आहे ती सरकारी रूग्णालये सुधारावीत, तसेच गणेश चतुर्थी पूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास सुखकर होण्यासाठी खासदार नारायण राणे यांनी प्रयत्न करावा, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.परूळेकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नारायण राणे त्यांच्यासाठी प्रचार सभा घेत तुम्हाला संसदेत बाक वाजवणारा खासदार पाहिजे की, लोकांचे प्रश्न सोडवणारा खासदार? असा सवाल केला होता. मात्र जनतेने विश्वासाने निवडून देऊनही भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी राणे यांना बाक वाजवणारा खासदार म्हणून संसदेत ठेवले आहे का? असा सवाल उपस्थित केला.राणे यांच्याकडील  सूक्ष्म लघु व मध्यम हे मंत्रीपद दुसऱ्याला देऊन एक प्रकारे कोकणी जनतेचा अपमान केला नाही का? असा प्रश्न उपस्थित केला. राणे यांनी खासदारकीचा उपयोग इथल्या जनतेसाठी जनतेचे जीवन सुकर होण्यासाठी करावा. कोकणचा विचार करता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अवैद्य मार्गाकडे युवक चालले आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे. उपजिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन मशिन येऊनही ती कोणाच्या प्रतीक्षेत आहे? ती का सुरू होत नाही? असा सवाल त्यांनी केला. सत्ताधाऱ्यांचे अपयश मंत्री केसरकर यांनी मल्टीस्पेशालिटीचे गाजर दाखवण्यापेक्षा आहे त्याच आरोग्य यंत्रणेमध्ये सुधारणा करावी. तसेच कुटीर रुग्णालयात सध्या औषधे मिळत नाहीत. तसेच डॉक्टर कमी अशा परिस्थितीत रूग्ण गोवा, बांबोळी येथे जावे लागत आहेत. हेच सत्ताधाऱ्यांचे अपयश असल्याचे टीका ही परूळेकर यांनी केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणेministerमंत्री