तळेरे/सिंधुदुर्ग : कॉलेज बंद, आॅनलाईन शिक्षणासाठी नेटवर्क नाही. अशा परिस्थितीत घरापासून दूर जिथे नेटवर्क मिळते तिथे भावाचा मोबाईल घेऊन झोपडीत पशुवैद्यकीय आॅनलाईन शिक्षण घेणाऱ्या स्वप्नाली सुतार हिच्या जिद्दीची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच तिच्यावर मदतीचा वर्षाव झाला. तिच्या संघर्षपूर्ण परिश्रमांना भरारी देण्याचे उमेद फौंडेशनेही ठरविले आणि तिला स्मार्ट फोन भेट दिला.तिच्याशी चर्चा केल्यानंतर तिला आॅनलाईन शिक्षणासाठी सध्या स्मार्ट फोनची नितांत आवश्यकता आहे याची माहिती मिळाली. त्यानुसार गणेशचतुर्थीच्या दिवशी उमेद फौंडेशनने तिला आॅनलाईन शिक्षणासाठी आवश्यक असणारा दर्जेदार कंपनीचा स्मार्ट फोन तिच्या घरी दारिस्ते येथे जाऊन तिच्याकडे सुपुर्द केला. यावेळी उमेद फौंडेशन सिंधुदुर्गचे सदस्य उपस्थित होते.उमेद फौंडेशन सातत्याने आपल्या जिल्ह्यातील गरजू मुलांना शैक्षणिक मदत करीत असते. यावर्षी उमेद फौंडेशन सिंधुदुर्गच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५०० गरजू शालेय मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यात आले आहे.
स्वप्नालीच्या स्वप्नांना उमेदची भरारी...उमेद फौंडेशनकडून स्मार्टफोन प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 2:13 PM
कॉलेज बंद, आॅनलाईन शिक्षणासाठी नेटवर्क नाही. अशा परिस्थितीत घरापासून दूर जिथे नेटवर्क मिळते तिथे भावाचा मोबाईल घेऊन झोपडीत पशुवैद्यकीय आॅनलाईन शिक्षण घेणाऱ्या स्वप्नाली सुतार हिच्या जिद्दीची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच तिच्यावर मदतीचा वर्षाव झाला. तिच्या संघर्षपूर्ण परिश्रमांना भरारी देण्याचे उमेद फौंडेशनेही ठरविले आणि तिला स्मार्ट फोन भेट दिला.
ठळक मुद्देस्वप्नालीच्या स्वप्नांना उमेदची भरारीउमेद फौंडेशनकडून स्मार्टफोन प्रदान