शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

पाणी उशाला अन् कोरड घशाला

By admin | Published: May 17, 2016 10:34 PM

टंचाईची कामे ठप्पच : यांत्रिकी विभागाचा ढिसाळ कारभार; पाणीपुरवठा मंत्र्यांकडे लवकरच तक्रार

वेंगुर्ले : खानोली-राऊळवाडी येथे २०१४-१५ मध्ये राष्ट्रीय पेयजल योेजनेखालील विहिरीवर लाखो रुपये खर्च केले. आणि त्या विहिरींना भरपूर पाणी असूनही त्याचे पाणी ग्रामस्थांना मिळत नाही. याबाबत ग्रामस्थांनी जानेवारी महिन्यात तक्रार करुनही अद्यापही त्याची दखल जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी विभागाने घेतली नाही. त्यामुळे पाणी उशाला अन कोरड घशाला अशी ग्रामस्थांची अवस्था झाली आहे. भाजपच्या कार्यालयात पाणीटंचाई संदर्भात भाजपचे तालुकाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी १६ एप्रिलला पाणीटंचाईचा पहिला आराखडा मंजूर करून एक महिना उलटला तरी टंचाईची कामे सुरु नाहीत. अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे पाणीटंचाई निवारण्यासाठी निधी देऊनसुद्धा कामे होत नसल्याचा आरोप देसाई यांनी केला. पाणी टंचाईच्या दुसऱ्या आराखड्यात जिल्ह्यातील २७ विंधन विहिरींना मंजुरी मिळाली आहे. परंतु आजपर्यंत एकाही विंधन विहिरीची खुदाई सुरु झालेली नाही. ३० एप्रिलला जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी विभागाने बोअरवेल मारणाऱ्या धरणी बोअरवेल कासार्डे, गणेश बोअरवेल जयसिंगपूर, एस. पी. बोअरवेल कणकवली यांना कार्यारंभ आदेश दिलेले होते. परंतु अद्यापही या चारही कंपन्यांनी कामे सुरु न केल्याने त्यांना यांत्रिकी उपविभागातर्फे नोटिसी काढल्याची माहिती देसाई यांनी दिली. एकीकडे पालकमंत्री केसरकर हे जिल्ह्यातील लोकांना पाणी टंचाईतून मुक्तता मिळावी म्हणून टंचाई आराखड्यांना मंजुरी देत आहेत. परंतु त्यांच्याच प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी कर्तव्यात कसूर करताना दिसत आहेत. पालकमंत्री केसरकर यांच्याकडे ग्रामविकासासारखे खाते असताना त्यांच्याच अखत्यारीत असलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकडून पाणीटंचाई आराखड्याचा बोजवारा उडाला आहे. याबाबत पालकमंत्री केसरकर यांची भेट घेऊन त्यांचे लक्ष वेधणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.शासन पाणीटंचाई निवारण्यासाठी वेगवेगळे उपयायोजना करीत असून निधीची तरतूद करीत आहे. परंतू अधिकारी व कर्मचारी यांच्या नाकर्तेपणामुळे त्याचप्रमाणे कंत्राटदाराबरोबर असलेल्या साटेलोट्यामुळे शासकीय योजनांची बदनामी होत आहे. या संदर्भात भारतीय जनता पार्टीतर्फे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोेणीकर यांच्याकडे तक्रार दाखल करणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.वेंगुर्लेतील ३० ग्रामपंचायतीनी १५० कामे अंदाजपत्रकासाठी प्रस्तावित केली आहे. परंतु ग्रामीण पुरवठा विभागाचे वेंंगुर्ले येथील अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे अंदाजपत्रके वेळेवर न मिळाल्यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतीची १० टक्केही कामे झाली नाहीत. त्याचा परिणामही पाणी टंचाईवर झाल्याचे देसाई यांनी सांगितले. यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाळा सावंत, सरचिटणीस प्रशांत खानोलकर, रविंद्र शिरसाठ, युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष हितेश धुरी, सुहास गवंडळकर, विनय गोगटे, बाळू प्रभू, आबा धोंड, सुनिल घाग, दीपक माडकर, शामसुंदर मुननकर, प्रकाश सावंत आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘त्या’ ठेकेदारांना काळ्या यादीत टाकापाणी टंंचाईसारख्या कामात ठेकेदार हेळसांड करत असतील व त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला होत असेल तर त्याची सर्वस्वी जबाबदारी त्या ठेकेदारावर व संबंधित अधिकारी यांच्यावर राहील. अशा ठेकेदारांना शासनाने काळ्या यादीत टाकावे, अशी मागणीही देसाई करणार आहेत.