कणकवली : कॉँग्रेसच्या काळातील मंत्र्यांनी जो भ्रष्टाचार केला. त्यामुळे राज्यावर साडेतीन लाख कर्जाचा बोजा पडला आहे. त्यामुळेच राज्य दिवाळखोरीच्या दिशेने वाटचाल करत असून कॉँग्रेसच्या नारायण राणेंना कोणावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथील पत्रकार परिषदेत केले. यावेळी तालुकाध्यक्ष रविंद्र शेटये उपस्थित होते. नारायण राणे, छगन भुजबळ यांचे असे कुठले व्यवसाय होते ज्यामुळे त्यांच्याकडे अमाप संपत्ती निर्माण झाली. धरणांना अब्जोवधी निधी दिला गेला. त्यातील कंत्राटदारांना दिल्या जाणाऱ्या रकमेपैकी बहुतांश निधी कॉँग्रेस आघाडी सरकारच्या मंत्र्यांच्या घशात गेला. कंत्राटदारांचे पैसे फेडण्यासाठी पुन्हा कर्जे काढण्यात आली. एकूण अर्थसंकल्पापैकी साडेतीन लाख पूर्वीचे कर्ज असून त्याचे व्याज आणि मुद्दल फेडण्यातच ६०-६५ हजार कोटी रूपये जातात. २.६० लाख कोटींचे बजेट आहे. त्यातील २० टक्के रक्कम अशी जाते. ४८ ते ५० टक्के रक्कम पगारावर खर्च होते. उर्वरित ३० टक्के बजेटपैकी १० ते १५ टक्के निधी अनियोजित बाबींसाठी जातो. उरलेल्या १०-१५ टक्के निधीतून नियोजित गोष्टींना तरतूद होते, असे जठार यांनी सांगितले. मोंड-वानिवडे पूलाला निधी मंजूरीचे श्रेय कोणीही घेत असेल. मात्र सभागृहात फक्त विषय मांडला म्हणजे काम होत नाही. त्याचा पाठपुरावा योग्य ठिकाणी करावा लागतो. आमच्या मंत्र्यांकडे यासाठी पाठपुरावा केल्यानेच मोंड-वानिवडे पूलासाठी निधी मंजूर झाला आहे. एवढी वर्षे पूलासाठी निधी का मंजूर झाला नाही? याचीही उत्तरे श्रेय घेणाऱ्यांनी द्यावीत, असे जठार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)नदीसंवर्धनासाठी कोट्यवधींचा निधी४जलपुरूष डॉ.राजेंद्र सिंह यांच्या पुढाकारातून कोकणातील नद्यांच्या पुनरूज्जीवनासाठी जलपरिषद घेण्यात आली. याच्या फलस्वरूप राज्यसरकारने वेगळा ‘नदी पुनरूज्जीवन’ शीर्ष तयार केला आहे. जलयुक्त शिवार अािण नदीसंवर्धनासाठी ठोक १ हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती प्रमोद जठार यांनी दिली.
कॉँग्रेसच्या भ्रष्टाचारामुळेच राज्य दिवाळखोरीत : जठार
By admin | Published: March 22, 2016 12:34 AM