शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

वैभववाडीत ओला दुष्काळासारखी स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 5:55 PM

गेला आठवडाभर कोसळणा-या मुसळधार पावसामुळे तालुक्याच्या काही भागात हातातोंडाशी आलेली भातशेती नष्ट झाली आहे. शुक्रवारी भुईबावडा परिसरात झालेल्या ढगफूटीच्या महापूरात मोठ्या प्रमाणावर भातशेती वाहून गेली आहे. त्यामुळे तालुक्यात ओला दुष्काळ सदृश्य स्थिती पहायला मिळत आहे. मात्र, प्रशासकीय यंत्रणा त्याची दखल घ्यायला तयार नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.   

ठळक मुद्देशुक्रवारच्या ढगफुटीने भातशेती जमीनदोस्तप्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्षशेतकरी झाला हवालदिल

प्रकाश काळे 

वैभववाडी दि. ०१: गेला आठवडाभर कोसळणा-या मुसळधार पावसामुळे तालुक्याच्या काही भागात हातातोंडाशी आलेली भातशेती नष्ट झाली आहे.

शुक्रवारी भुईबावडा परिसरात झालेल्या ढगफूटीच्या महापूरात मोठ्या प्रमाणावर भातशेती वाहून गेली आहे. त्यामुळे तालुक्यात ओला दुष्काळ सदृश्य स्थिती पहायला मिळत आहे. मात्र, प्रशासकीय यंत्रणा त्याची दखल घ्यायला तयार नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.तालुक्यातील पन्नास टक्के भातशेती कापणीलायक झाली आहे. परंतु, गेला आठवडाभर दररोज दुपारनंतर कमी अधिक प्रमाणात तालुक्याच्या सर्व भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्याचा सर्वाधिक फटका भातशेतीला बसला आहे. शुक्रवारी भुईबावडा पंचक्रोशीत ढगफूटी होऊन नद्या नाल्यांना रेकॉर्डब्रेक महापूर आला होता. त्या महापुराने नदी नाल्याकठची भातशेती अक्षरशः धुवून नेली आहे. तर ब-याच ठिकाणी महापुरात दगडगोट्यांसह वाहून आलेल्या गाळाने संपुर्ण भातशेती जमीनदोस्त केली आहे.       शुक्रवारच्या ढगफूटीमुळे भुईबावडा आंबेवाडीतील शेवंती वसंत मोरे, सुंदरा सुरेश मोरे, अहिल्या रघुनाथ मोरे, महेश मनोहर पाटणे, अरविंद जयसिंग मोरे, सुनीतेश रघुनाथ मोरे, नितीन निवृत्ती मोरे, अभय चंद्रकांत पाटणे यांची भातशेती पाण्याखाली जाऊन घराच्या दरवाजाला पुराचे पाणी लागले होते. तर दत्ताराम मोरे यांची नाचणी, संतोष पाटणे यांच्या भातशेतीचे नुकसान झाले आहे. तसेच अरविंद मोरे यांची विहीर कोसळली आहे.तसेच कुसुर मळेवाडी येथील पुलावरुन पाणी गेले. त्यामुळे संतोष साळुंखे, प्रकाश साळुंखे यांच्या घरात पाणी घुसले होते. तर रामेश्वर-दारुबाई मंदिराची चिरेबंदी संरक्षक भींत आणि खडकवाडी येथील गणपती विसर्जन घाट महापुरात वाहून गेला. या महापुराच्या तडाख्यात झालेल्या नुकसानीचा गेल्या तीन दिवसांत पंचनामाही झालेला नाही. त्यामुळे शेतक-यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आह

पर्जन्यमापन सदोष?       वैभववाडी तालुक्यात पडणारा पाऊस मोजण्यासाठी यावर्षी स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रणा बसविण्यात आली आहे. गेले काही दिवस सातत्याने दोन-तीन तास मुसळधार पाऊस पडत आहे.  मात्र पावसाची तीव्रता आणि कालावधी जवळपास सारखा असूनही पावसाच्या आकडेवारीत कमालीची तफावत आढळून येते. शुक्रवारी भुईबावडा पंचक्रोशीत जी ढगफूटी झाली. तो पाऊस वैभववाडीत नव्हता. त्याची नोंद 80 मिलीमीटर झाली.

जवळपास तेवढाच पाऊस शनिवारी वैभववाडी परिसरात झाला. मात्र, शनिवारच्या पावसाची केवळ 30 मिलीमीटर एवढी नोंद महसूलकडे आहे. ही तफावत वारंवार जाणवत असल्यानेआपदग्रस्तांना नुकसान भरपाईसाठी त्याचा फटका बसत आहे.