सिंधुदुर्ग : मागील काही वर्षामध्ये प्रत्येकांच्या हातात मोबाइल आला आहे. त्यामुळे अनेक जण मोबाइलच्या आहारी गेले आहे. व्हॉट्सॲप, स्टेटस, वारंवार पाहण्याची सवयही अनेकांना जडली आहे. व्हॉट्सॲप, स्टेट्स वारंवार पाहण्याचा मोह आवरत नसले तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. मोबाइलपासून काही वेळ दूर राहण्याचा प्रयत्न करा. अधिक वेळ मोबाइल बघत असाल तर मेंदूला अधिक ताण येऊन आरोग्य बिघडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.मोबाइलचे जसे चांगले फायदे आहेत. तसेच काही दुष्परिणामदेखील आहेत. मोबाइलच्या जास्त वापरामुळे अनेक समस्या समोर येत आहेत. त्यात मानसिक आरोग्यावर परिणाम अधिक होत आहे. मोबाइलचा अतिवापर डोळ्यांसह मेंदूवरही परिणाम होतो. याबरोबरच आता व्हॉट्सॲप, स्टेट्स वारंवार पाहण्याची सवयदेखील अनेकांना जडली आहे. झोपण्यापूर्वी किवा झोपेतून उठल्याबरोबर अनेक जण मोबाइल हाती घेतात.
मोबाइल वापरताना काय काळजी घ्याल ?
- शक्यतो महत्वाचे काम असेल तर मोबाइलचा वापर करावा.
- रात्री झोपण्यापूर्वी किवा सकाळी उठल्याउठल्या मोबाइल हाती घेऊ नये.
- कुटुंबातील लहान मुलांसमोर मोबाइलचा जास्त वापर करू नये.
‘नो-मोबाइलडे’ पाळावारंवार मोबाइल पाहणे ही घातक सवय अनेकांना जडली आहे. तासनतास वारंवार मोबाइल पाहणे, मोबाइलशिवाय कशातच मन न लागणे ही मानसिक आजाराची लक्षणे आहेत.वारंवार मोबाइल पाहणे घातक असून त्याचा मेंदूवरही परिणाम पडतो. मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी आठवड्यातून एक दिवस ‘नो मोबाइल डे’ पाळायला हवा.
रात्री झोपण्यापूर्वी अधिकवेळ मोबाइल वापरल्याने शरीरातील मेलाटोनिन हॉर्मोनची लेव्हल कमी होते. यामुळे झोपेवर परिणाम होतो. निद्रानाशाची दीर्घकालीन समस्या निर्माण होऊ शकते. याच सवयीमुळे ब्रेन हेल्थवरसुद्धा परिणाम होतो. दीर्घकाळासाठी रात्री फोन वापरल्याने आपली मेमरी कमकुवत होण्याची शक्यता असते. याशिवाय मेंदूशी संबंधित इतर समस्याही उद्भवू शकतात. - डॉ. अनिलकुमार वैद्य, मसुरे (ता. मालवण)